डोंबिवलीत जागतिक सायकल दिनानिमित्त पर्यावरण संदेश फेरी
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : शहरातील वाढते प्रदूषण परिणामी आरोग्य आणि पर्यावरण जागृती करण्यासाठी 3 जून जागतिक सायकल दिन म्हणून मिलापनगर, एमआयडीसी निवासी भागात सायकल फेरी रविवारी काढण्यात आली. या फेरीचे आयोजन “एव्हरग्रीन सायकल प्रेमी” या महिलांच्या संघटनेने केले. सायकल फेरीत एकूण 57 लहान मुले, महिला व काही पुरुष सहभागी झाले होते.
सायकल चालविल्याने आपले आरोग्य चांगले राहते तसेच प्रदूषण रोखण्यास हातभार लागतो हा उद्देश साधण्यासाठी एमआयडीसी निवासी मधील काही महिलांनी “एव्हरग्रीन सायकल प्रेमी” या नावाने ग्रुप तयार केला. या ग्रुपने जुन्या सायकली अनेक जणांकडून घेऊन त्या स्वखर्चाने दुरुस्त करून घेतल्या आहेत. ज्या कोणाला आपल्या जुन्या/नव्या सायकली आणि हेल्मेट दान स्वरूपात द्यायचे असेल त्यांनी संपर्क साधून द्याव्यात अशी विनंती त्यांच्यातर्फे करण्यात आली आहे.
एव्हरग्रीन सायकल प्रेमी तर्फे 5 जून या जागतिक पर्यावरण दिवशी उंबार्ली टेकडीवर वृषारोपण करण्यात येणार आहे तर 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दीन आणि वट पौर्णिमा याचे निमित्त साधून वडाच्या झाडाचे वृक्षारोपण आणि योग व्यायाम याचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. जागतिक सायकल दीन निमित्त काढलेल्या फेरी मध्ये कु. आदिरा ठाकूरदेसाई, त्रिशा कुलकर्णी, अथर्व आठवले, सार्थक कुलकर्णी, मंथन नाईक, वैष्णवी चौगुले या लहान आणि तरुण मुलांमुली बरोबर सुवर्णा राणे, सरोज विश्वामित्रे, वर्षा महाडिक, योगिता थोटांगे, शोभा चौगुले, विभावरी वाघमारे, स्मिता पाठक, मनीषा तांबे, गौरी बर्वे, सरोज उपाध्ये, स्नेहा कुलकर्णी, विद्या जडे, सुनीता केसुर, रत्नमाला वाबळे, शोभना नाईक, मीना कुलकर्णी, उज्वला नाईक, सुनीता यादव, कल्पना चौधरी, वैशाली हर्षे, सुनंदा मस्तुत, नीलिमा कुलकर्णी, अनुजा सावंत, दीपा नाईक, चैत्रा मोरे, सरिता दुसाने, नमिता सोनार, आराध्या शेट्टी, किशोरी कोळेकर, संगीता पोळेकर, कल्पना बोंडे, मुग्धा जोशी, श्रध्दा पटवर्धन, नालंदा शेवाळे, स्नेहल खापरे, अनिता जैस्वाल, किरण कानोजिया, अर्चना पाटील या महिला आणि राजु नलावडे, विजयकुमार चौगुले, विनायक पाटील इत्यादी सहभागी झाले होते.