नीरी नागपूर तर्फे 27 मे रोजी ‘ऊर्जा संवाद: स्वच्छ, व्यवहार्य,समावेशक” या विषयावर विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन
नागपूर 26 मे 2025 : हवामानातील वाढत्या गरजा आणि वाढत्या ऊर्जेच्या मागणी लक्षात घेता, केंद्रीय वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद सीएसआयआर अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था मार्फत 27 मे मंगळवार रोजी हॉटेल सेंटर पॉइंट, रामदासपेठ, नागपूर येथे “ऊर्जा संवाद: स्वच्छ, व्यवहार्य,समावेशक” या विषयावर विचारमंथन कार्यशाळा आयोजित करणार असल्याची माहिती निरी नागपूरचे संचालक डॉ. व्यंकट मोहन यांनी दिली.
सकाळी 9 ते सायंकाळी 6:30 वाजे पर्यंत चालणाऱ्या या एक दिवसीय कार्यशाळेत आघाडीचे तज्ञ, धोरणकर्ते, संशोधक आणि उद्योग भागधारकांना एकत्र आणून विचारांची आणि नाविन्यपूर्ण उपायांची सर्वसमावेशक देवाणघेवाण केली जाईल. मागील ६७ वर्षांपासून निरीचे समाजासाठी आणि देशासाठी कार्य सुरू असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वाची अशी भूमिका निरी निरंतर पार पाडत आहे.निरी ही संशोधन क्षेत्रातील प्राथमिक माहितीची संरक्षक असून संशोधन आणि धोरणनिर्मिती साठी सरकारी संस्थाबरोबरच खाजगी क्षेत्रात सुद्धा सहकार्य करते. देशातील 5 क्षेत्रीय कार्यालयातून नीरीचे कार्य सुरू आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन क्षेत्रात निरीचे मानांकन आणि विश्वासहार्यता अग्रगण्य असल्याचे डॉ . मोहन यांनी सांगितले.
या कार्यशाळेत IIT च्या 4 संस्था NIT च्या 3 संस्था, टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि CSIR शी संबंधित संस्था कार्यशाळेत सहभागी होतील त्याचबरोबर नागपुरातील विविध संस्था उपस्थित राहतील. या कार्यशाळेतून निरी आपली ऊर्जा क्षेत्रातली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती निरी नागपूरचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. नितीन लाभसेटवार यांनी दिली.
जीवाश्म इंधनाला पर्याय म्हणून नवीन ऊर्जा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी या कार्यशाळेत चर्चा होईल अशी माहिती त्यांनी दिली.या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरणीय शाश्वतता, सामाजिक समता आणि आर्थिक लवचिकतेशी ऊर्जा विकासाचे संरेखन करणे आहे. ही कार्यशाळा स्वच्छ ऊर्जा निर्मिती, उत्सर्जन नियंत्रण, हरित कौशल्य आणि कार्बन वित्त यामधील कृतीशील मार्गांचा शोध घेण्यासाठी एक गतिमान मंच म्हणून काम करेल असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेअंतर्गत आंतर-क्षेत्रीय सहकार्याला चालना मिळणार असून पुराव्यांवर आधारित धोरणनिर्मितीला हातभार लागेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.ज्ञानाची देवाणघेवाण आणि संवादांद्वारे, हा उपक्रम स्वच्छ, स्मार्ट आणि अधिक समावेशक ऊर्जा परिसंस्थेकडे जाण्याच्या प्रक्रियेला गती देईल असा विश्वास डॉ . लाभसेटवार यावेळी व्यक्त केला.
सीएसआयआर-नीरी कचरा व्यवस्थापन, जैवऊर्जा, वर्तुळाकार जैवअर्थव्यवस्था आणि डीकार्बोनायझेशन धोरणांमध्ये संशोधन आणि विकासाचे नेतृत्व करत आहे. संस्थे मार्फत सूक्ष्मजीव इलेक्ट्रोकेमिकल प्रणाली, बायोरिफायनरीज आणि कचरा मूल्यांकन यांसह अग्रगण्य उपायांसह आघाडीवर आहे. या उपक्रमांद्वारे, सीएसआयआर-नीरी शाश्वत आणि लवचिक