टीव्हीएस मोटर कंपनीने भारतात सादर केली पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल; पर्यावरणपूरक निर्मिती
नवी दिल्ली : दुचाकी व तीन चाकी वाहने बनवणारी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सादर केली आहे. भारताचे रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री माननीय नितीन जयराम गडकरी, नीती आयोगाचे सीईओ मिताभ कांत व टीव्हीएस मोटरकंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या हस्ते या मोटरसायकलचे उदघाटन करण्यात आले.
पर्यावरणपूरक इथेनॉल :
इथेनॉलचे उत्पादन नूतनीकरणीय प्लान्ट स्रोतांकरवी देशात केले जाते. हे विषारी नसते, बायोडिग्रेडेबल आहे, हाताळणी, साठवण आणि वाहतूक या सर्वदृष्टीने सुरक्षित आहे. हे ऑक्सिजनेटेड इंधन असून यामध्ये प्राणवायूचे प्रमाण ३५% आहे. त्यामुळे इथेनॉल जळत असताना त्यातून नायट्रोजनऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमाण कमी असते. याशिवाय इथेनॉल कार्बन मोनॉक्सईड उत्सर्जन, पर्टिक्युलेट मॅटर व सल्फर – डाय – ऑक्साइड यांचे प्रमाणकमी करण्यात देखील मदत करते. इंधन म्हणून एथॅनॉलच्या वापरामुळे पेट्रोलियम आयातीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होईल व देशाची ऊर्जासुरक्षा वाढेल.
टीव्हीएस मोटर कंपनीने सर्वात आधी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये टीव्हीएस Apache RTR 200 ४व्ही इथेनॉल ची संकल्पना मांडली होती. टीव्हीएस Apache हा टीव्हीएस मोटर कंपनीचा सर्वात प्रमुख ब्रँड असून जगभरात ३.५ मिलियनपेक्षा जास्त समाधानी ग्राहक याब्रॅण्डचा आनंद घेत आहेत.
ही अतिशय खास मोटरसायकल भारतात दाखल होत असल्याबद्दल टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी सांगितले, “देशात आधुनिक वाहतूक व्यवस्था कार्यान्वित व्हावी यासाठीचा आराखडा ज्यांनी तयार केला असे भारताचे रस्ते वाहतूक व महामार्ग आणि सूक्ष्म लघु मध्यमउद्योग मंत्री माननीय नितीन जयराम गडकरी यांच्या उपस्थितीत टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 चे उदघाटन होत आहे हा आमच्यासाठीअतिशय आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे.”
श्रीनिवासन यांनी पुढे सांगितले, “आज दुचाकी वाहन उद्योगक्षेत्र इलेक्ट्रिक, हायब्रीड व पर्यायी इंधन अशा सर्व विभागांमध्येहरित व चिरस्थायीआधुनिक सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करत आहे. टीव्हीएस मोटर कंपनी असे मानते की, इथेनॉलवर चालणारी उत्पादने हा आमच्याग्राहकांसाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे. एथॅनॉलच्या बाबतीत ट्रॅजिशनमध्ये सहज अनुकूलता असल्यामुळे आणि कामगिरी तसेच गाडीच्यामालकीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाच्या बाबतीतअजिबात तडजोड करावी न लागता पर्यावरणावर होणारा सकारात्मक प्रभाव ही यामागची प्रमुखकारणे आहेत. टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही दुचाकी उद्योगक्षेत्रातील क्रांती आहे. ही गाडी भारतात हरित भवितव्य घडवण्याचा ट्रेंडसुरुकरेल.”
टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 वर इथेनॉल लोगोसोबत अतिशय सुबकतेने घडवलेले ग्रीन ग्राफिक्स अतिशय शानदार दिसतात. यामध्ये ट्वीन-स्प्रे-ट्वीन-पोर्ट ईएफआय तंत्रज्ञान आहे. गाडी चालवण्यात अधिक चांगली सुलभता, वेगवान थ्रोटल रिस्पॉन्स व उत्सर्जन पातळीमधील घट ही याचीखासियत आहे. विविध प्रकारच्या स्थितींमध्ये ही गाडी अधिक चांगली शक्ती व अधिक चांगली कामगिरी देते. या मोटरसायकलची अतिशय प्रभावीसर्वात जास्त शक्ती ८५०० आरपीएमला २१ पीएस व टॉर्क ७००० आरपीएमला १८.१ एनएम आहे. ही गाडी दर तासाला १२९ किमी इतका सर्वात जास्तवेग गाठू शकते.
चिरस्थायी हरित सुविधा व सातत्यपूर्ण उच्च कामगिरी यांचे वचन देणारी टीव्हीएस Apache RTR 200 Fi E100 ही गाडी रायडर आणि पर्यावरण यादोन्हींच्या दृष्टीने सर्वोत्तम आहे. ही स्पेशल एडिशन गाडी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक मध्ये १,२०,००० रुपये या आकर्षक किमतीला उपलब्ध होणार आहे.