‘ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मोहीमेला बिंदू चौकात फलक घेऊन पाठिंबा
कोल्हापूर : ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक’ मोहीमेला बिंदू चौकात फलक घेऊन पाठिंबा देण्यात आला.
स्वीडनची १६ वर्षे वयाची विद्यार्थीनी ग्रेटा थनबर्ग हिने जागतिक तापमान वाढीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जागतिक पातळीवर तापमानवाढीचा मुद्दा चर्चेला आला आहे. ग्रेटा थनबर्ग हिने सुरू केलेले आंदोलन जगभर पसरले असून जगातील असंख्य विद्यार्थी पर्यावरण प्रश्नाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. आज २० सप्टेंबरला १ वर्षे पुर्ण होत आहेत. २० ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान जगभरातील लाखो तरूण पर्यावरणाचा ऱ्हास आणि बदलांचा विरोध करण्यासाठी संप आणि निदर्शने करणार आहेत. त्यासाठी ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक संदेश पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात आहे. असे एसएफआय राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे
यांनी माहिती दिली. पुरोगामी संघटनांच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मॉर्निंग वॉकच्या वेळी ते बिंदू चौक येथे बोलत होते. बिंदू चौकात नागरिकांनी हातात फलक घेऊन ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक मोहिमेला पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी प्राचार्य टी. एस. पाटील, व्यंकाप्पा भोसले, कृष्णात स्वाती, कृष्णात स्वाती, दिलीप पवार, सतिशचंद्र कांबळे, रवी जाधव, सिमा पाटील लोकेश कांबळे, महादेव शिंगे, हरिष कांबळे आदींसह नागरिक उपस्थित होते.