मुलुंडमध्ये आढळला दुर्मिळ साप तर भांडुपमध्ये माशांच्या टोपलीमध्ये होता समुद्रसर्प
मुंबई : मुलुंडमध्ये एका घरात दुर्मिळ साप आढळून आला तर भांडुपमध्ये माशांच्या टोपलीत समुद्री साप सापडला. सापांबाबत माहिती मिळताच पॉज-मुंबई एसीएफच्या स्वयंसेवकांनी त्यांची सुटका केली. सापांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मुलुंड पश्चिम मलबार हिल येथे राहणारे हर्षद सावला यांनी प्लँट अँड ऍनिमल वेल्फेयर सोसायटी – मुंबई (पॉज-मुंबई) आणि अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) यांच्या हेल्पलाईन क्रमांकावरती फोन केला . माहिती मिळताच स्वयंसेवक हसमुख वळंजू घटनास्थळी पोहोचले. घर तपासताना साप एका कपाटाच्या पाठीमागे जाऊन लपला होता. सापाची सुखरूप पणे त्याची सुटका केली.
भांडुप येथून गाढव नाका मच्छी मार्केट माशांच्या टोपलीमध्ये समुद्रसर्प माशांबरोबर आढळून आला होता. तेथील मच्छी विकणाऱ्याने तो साप काठीने मच्छी च्या टोपलीतून बाजुला केला. तेथील रहिवासी प्रणव सावंत यांच्या निदर्शनास आले. प्रणव यांनी दिलेल्या माहितीनुसार पॉज-मुंबई एसीएफचे स्वयंसेवक हसमुख वळंजू त्यांनी त्या सापाला ताब्यात घेतले.
दोन्ही सापांना पशुवैद्यकीय डॉ. राहुल मेश्राम यांच्याकडे तपासणी करण्यासाठी नेण्यात आले. डॉ. राहुल यांनी सांगितले. ट्रॅवेनकोर कवड्या साप अंदाजे दीड फूट याची सरासरी लांबी आहे. आणि समुद्री एकेरी सर्प दोन फुटी आहे. दोन्ही साप सुदृढ असून निसर्ग मुक्त करण्याचे प्रमाणित करण्यात आले.
मानद वन्यजीव रक्षक आणि पॉज-मुंबई एसीएफचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यन यांनी सांगितले की दोन्ही सापांची माहिती वनविभागाला देण्यात आली आणि त्या सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
ट्रॅवेनकोर कवड्या साप हा पश्चिम घाटात सापडतो मुंबई इथं हा साप दुर्मिळ आहे. हा साप बिनविषारी आहे प्रजनान च्या वेळी ऑगस्टमध्ये मादी दोन ते चार अंडी घालते. व सरासरी त्याची लांबी ४८ सेंटीमीटर म्हणजेच एक फूट सात इंच इतकी वाढू शकते. या सापाचे प्रमुख खाद्य जंगलातील पाली व छोटे सरडे व छोटे अंडी हे त्याचे खाद्य आहे.
समुद्री एकेरी सर्प हा साप भारताच्या संपूर्ण समुद्री किनारपट्टीवर आढळला जातो. या सापाची सरासरी लांबी 100 सेंटीमीटर म्हणजेच तीन फूट तीन इंच व अधिकतम लांबी एकशे वीस सेंटीमीटर म्हणजेच तीन फूट अकरा इंच असे आहे हा साप बिनविषारी आहे. हा साप समुद्रात राहत असल्याने मुख्यत: मासे हे त्याचे प्रमुख खाद्य आहे.