कांजूरमार्गमध्ये आठ फुट अजगर तर मुलुंडमध्ये सापडला एक फुट अजगर आणि ‘तस्कर’ साप
मुंबई l कांजूरमार्गमध्ये आठ फुट अजगर तर मुलुंडमध्ये एक फुट अजगर आणि एक ‘तस्कर’ साप सापडला. त्यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
कांजूरमार्ग एल.बी.एस. मार्ग येथे अवंती कंट्रक्शन साईटच्या येथे अजगर आढळला. प्लँट अँड ऍनिमल वेल्फेयर सोसायटी – मुंबई (पॉज-मुंबई) आणि अम्मा केअर फाउंडेशन (एसीएफ) चे स्वयंसेवक हसमुख वळंजू यांना माहिती मिळाली. त्यांनी मध्यरात्री अडीच वाजता अवंती कंट्रक्शन साइटवर आठ फुट अजगर पकडला. संतोष बावकर यांनी पॉज-मुंबई एसीएफच्या मदत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून सांगितले की एक अजगर नेवल डॉकयार्ड कॉलनी एलबीएस मार्ग ओलांडून कंट्रक्शन साइटवर शिरला. अजगराची सुटका करून वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर राहुल मेश्राम यांच्याकडे नेण्यात आले. अजगर सुदृढ असून याची माहिती वनविभागाला देऊन निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. अशी माहिती पॉज-मुंबई एसीएफचे संस्थापक सुनीष सुब्रमण्यन यांनी सांगितले.
पहाटे सकाळी साडेसहाच्या सुमारास रमेश चव्हाण यांचा पॉज-मुंबई एसीएफ दूरध्वनी क्रमांक वरती यांचा फोन आला. आमच्या दरवाजा मध्ये एक छोटा अजगर आला आहे. माहिती मिळताच पॉज-मुंबई एसीएफचे स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचून एक फूटी अजगराला ताब्यात घेतले.
दुर्मिळ तस्कर साप मुलुंड पश्चिम अमर नगर येथे एका घरावरती हा साप दिसून आला. स्थानिक रहिवाशी विशाल सुरडकर यांनी पॉज-मुंबई एसीएफच्या दूरध्वनी क्रमांक वरती संपर्क साधला.तेथील स्थानिक स्वयंसेवक यांनी त्या सापाला सुखरूपपणे रेस्क्यू केले. तीनही सापांना निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.
👉 अजगर बिनविषारी साप आहे. पालापाचोळ्याचे ढीग करून मादी त्यात नऊ ते दहा अंडी घालते व शरीराचे वेटोळे करून ती अंडी उबवते. अंडी नऊ ते दहा सेंटिमीटर लांबीची व सुमारे 100 ग्रॅम वजनाची असते. नव्वद ते शंभर दिवसात पिल्ले अंड्यातून बाहेर येतात व ती पिलांची लांबी 30 सेंटीमीटर इतकी असते. अजगराचे प्रमुख खाद्य उंदीर घूस, बेडूक व इतर सस्तन मोठे प्राणी आहे. अजगराची अधिकतम लांबी अंदाजे 24 फुट इतकी वाढते.
👉 तस्कर साप बिनविषारी आहे. हा साप मुंबईमध्ये दुर्मिळ आहे. या सापाची सरासरी लांबी सहा फूट इतकी होते. याचे प्रमुख खाद्य इतर पक्ष्यांची अंडी पक्षी व गरज लागता उंदीरही खाद्य घेतो. मादी तस्कर साप दहा ते अकरा अंडी घालते व शरीराचे वेटोळे करून ती त्यांना उबवते. अंड्यातून पिल्ले बाहेर पडल्यानंतरच आपल्या मार्गात ती तेथील जागा सोडून देते.