खारफुटीवरील मराठीतील पहिल्याच पुस्तकाचे ‘गोदरेज अँड बॉयस’कडून प्रकाशन
मुंबई, 5 मे 2021 : गोदरेज समुहातील प्रमुख कंपनी, ‘गोदरेज अँड बॉयस’ने “मेनी सिक्रेट्स ऑफ मॅनग्रूव्हज” या कथा पुस्तकाची मराठी आवृत्ती सादर करीत असल्याची घोषणा आज केली. खारफुटीवरील हे पहिलेच कथा पुस्तक आहे. प्रख्यात बालसाहित्यिका केटी बागली यांच्या सहकार्याने 2019 मध्ये ते प्रथम इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले होते. ‘‘करामती खारफुटी’’ नावाची ही मराठी ई-आवृत्ती हे मराठीतील या विषयावरील पहिलेच कथा पुस्तक आहे. अद्भुत आणि नाजूक अशा खारफुटीच्या परिसंस्थेला ते समर्पित आहे.
‘गोदरेज अँड बॉयस’ कंपनीने खारफुटी परिसंस्थेच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याकरीता आखलेल्या अनेक उपक्रमांमध्ये हे पुस्तक येते. पर्यावरणीय समतोल जपण्यासाठी, राखण्यासाठी खारफुटी बजावत असलेल्या मोलाच्या भूमिकेबद्दल जास्तीतजास्त मुलांना शिक्षण देता यावे, या उद्देशाने या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करण्यात आला आहे. या पुस्तकाची ई-आवृत्ती इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये ‘गोदरेज मॅनग्रूव्हज वेबसाइट’वर उपलब्ध आहे. खारफुटीला समर्पित असलेली ही एकमेव वेबसाइट आहे.
या मराठी पुस्तकाच्या प्रकाशनासंदर्भात बोलताना डॉ. फिरोजा गोदरेज म्हणाल्या, “खारफुटी ही पर्यावरणाला आवश्यक अशी वनस्पती आहे, याविषयी समाजाला शिक्षित करण्याचे गोदरेज येथे आमचे ध्येय आहे. आता इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असलेले हे कथापुस्तक लहान मुलांमध्ये खारफुटीच्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्याचे एक उत्तम साधन आहे. या नाजूक, महत्त्वपूर्ण परिसंस्थेच्या संवर्धनाचा संदेश पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्नांना या नवीन प्रकाशनातून मदत होईल, अशी आम्हाला खात्री आहे.”
मुंबईतील सर्वात मोठ्या खारफुटीपैकी एक असलेल्या विक्रोळी येथील खारफुटीचे सक्रिय व्यवस्थापन व संवर्धन ‘गोदरेज अँड बॉयस’ गेल्या काही दशकांपासून करीत आहे. तसेच, खारफुटीचे रक्षण करण्याच्या आवश्यकतेबद्दल ती जागरूकता निर्माण करीत आहे. खारफुटीविषयी जनतेमध्ये संवेदना जागृत करण्यासाठी कंपनी असंख्य उपक्रम राबवीत आहे. खारफुटीविषयी एकमेवाद्वितीय असे 11 भाषांमधील मोबाईल अॅप, मराठीतही उपलब्ध असलेली खारफुटीला समर्पित अशी वेबसाईट, मुंबईतील शैक्षणिक संस्थांमधील प्रदर्शने, तसेच डब्ल्यूडब्ल्यूएफ इंडियाशी संबंधित राहून ‘मॅजिकल मॅनग्रूव्हज’ ही चळवळ चालविणे, हे त्यांतील काही उल्लेखनीय उपक्रम आहेत. पुढील पिढ्यांसाठी पर्यावरण जपण्याकरीता आणि खारफुटीचे संरक्षण करण्याकरीता कटिबद्ध असलेले हे उपक्रम आठ राज्यांमध्ये चालविण्यात येतात.
मराठी ई-पुस्तक वाचण्याकरीता पुढील लिंकवर क्लिक करा… https://mangroves.godrej.com/Resources/pdf/Mangroves_marathi_book.pdf
इंग्रजी ई-पुस्तक वाचण्याकरीता पुढील लिंकवर क्लिक करा … https://mangroves.godrej.com/resources/pdf/TwoPageBook.pdf
गोदरेजच्या संवर्धनाच्या प्रयत्नांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील वेबसाईट पाहा .. www.mangroves.godrej.com
‘गोदरेज मॅनग्रूव्हज’विषयी :
विक्रोळी येथील ‘गोदरेज मॅनग्रूव्हज’ची मूक परिसंस्था सेवा ही तिच्या सीमेबाहेर, संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशापर्यंत पोचलेली आहे. दोन वर्षांच्या संशोधनात असे निष्पन्न झाले आहे की, बायोमास आणि गाळ यांसह उभ्या झुडुपांमध्ये 6 लाख टनांच्या समकक्ष इतक्या कार्बन डायऑक्साईड वायू साठवून ठेवण्याची क्षमता आहे. ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलांसाठी जबाबदार असा हा ‘ग्रीनहाऊस वायू’ आहे. याव्यतिरिक्त, दरवर्षी सुमारे 60,000 समकक्ष टन कार्बन डाय ऑक्साईडचे विलगीकरण केले जाते. खारफुटीमुळे जमिनीची धूप थांबते. नैसर्गिक चक्र आणि पोषक तत्वांचे पुनरुज्जीवन यांद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्यात खारफुटीची परिसंस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.