ई-वेस्टवर स्मार्ट मात : ई-वेस्टच्या व्यवस्थापनासाठी AI चा वापर by orf marathi
संदर लेख orf marathi वर प्रकाशित झाला आहे.
ई-वेस्टच्या संकटावर निर्णायक तोडगा काढण्याची हीच योग्य वेळ आहे. AI चा चोख आणि उद्दिष्टपूर्ण वापर, नव्या हितसंबंधी संस्थांमध्ये समन्वय आणि समाजात जनजागृती निर्माण करणाऱ्या प्रभावी मोहिमा या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून भारत तंत्रज्ञानाच्या आधारावर सक्षम झालेल्या सर्क्युलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने ठोस आणि शाश्वत पावलं टाकत आहे.
मार्च 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “Pro Planet People (P3)” हा दृष्टिकोन मांडत भारताचं सर्क्युलर इकॉनॉमीकडे असलेलं दूरदृष्टीपूर्ण धोरण जगासमोर ठळकपणे मांडलं. आशिया-पॅसिफिकमधील 12व्या ‘3R आणि Circular Economy Forum’ मध्ये त्यांनी ‘Reduce, Reuse, Recycle (3R)’ या त्रिसूत्रीवर आधारित शाश्वत शहरी विकास, संसाधन कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यावर भर दिला.
या तत्त्वांचा सर्वात तातडीने आणि प्रभावी उपयोग सध्या ई-वेस्ट व्यवस्थापनात करणे गरजेचे आहे. भारत हा चीन आणि अमेरिका नंतरचा तिसरा सर्वात मोठा ई-वेस्ट उत्पादक देश आहे. 2024 मध्ये भारतात सुमारे 3.8 दशलक्ष मेट्रिक टन (MMT) ई-वेस्ट तयार झाला, ही संख्या गेल्या दशकातल्या पातळीच्या दुप्पट आहे. यामागची प्रमुख कारणं म्हणजे लोकांची वाढती खरेदीशक्ती, तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असलेला स्वीकार आणि झपाट्याने होणारं शहरीकरण.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी orf marathi येथे क्लिक करा