होलिकोत्सव : पर्यावरणपुरक पाच रंगाचे पॅकेट भेट देत पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या शुभेच्छा !!
मुंबई : निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा…!संकल्प वसुंधरेच्या रक्षणाचा…! असे म्हणत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.होळी व धुलीवंदनानिमित्त सर्वांनी पर्यावरण पूरक होळी साजरी करावी या उपक्रमाच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पर्यावरण पुरक पाच रंगाचा समावेश असलेले पॅकेट देऊन पर्यावरण स्नेही होळी साजरी करण्याच्या शुभेच्छा पंकजा मुंडे यांनी दिल्या.