प्रदूषित नद्या ओळखण्यासाठी संनियंत्रण समिती
नवी दिल्ली, 8 मार्च 2021: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (एसपीसीबी) / प्रदूषण नियंत्रण समिती (पीसीसी) च्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) संनियंत्रण स्थानकांच्या जाळ्याद्वारे देशातील नद्यांच्या आणि अन्य जलाशयातील पाण्याच्या गुणवत्तेची नियमितपणे देखरेख करीत आहे. सप्टेंबर, 2018 च्या सीपीसीबीच्या अहवालानुसार, जैव-रासायनिक ऑक्सिजन मागणीच्या (बीओडी) पातळीनुसार जैविक प्रदूषणाचे सूचक धर्तीवर केलेल्या संनियंत्रण निकालानुसार 323 नद्यांमधील 351 प्रदूषित नदीचे पट्टे आढळले आहेत. प्रदूषित नदीच्या पट्ट्यांचे राज्यनिहाय तपशील जोडपत्रात दिले आहेत.
त्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 53 नद्या आहेत. त्या अशा-
गोदावरी, काळू, कुंडलिका, मिठी, मोरना, मुळा, मुठा, नीरा, वेल, भीमा, इंद्रायणी, मुळा-मुठा, पवना, वैनगंगा, वर्धा, घोड, कन्हान, कोलार (माह), कृष्णा, मोर, पातालगंगा, पेढी, पेनगंगा , पूर्णा, तापी, उरमोडी, वेन्ना, वाघूर, वेना, बिंदुसार, बोरी, चंद्रभागा, दारणा, गिरणा, हिवारा, कोयना, पेहलार, सीना, तीतूर, अंबा, भातसा, गोमाई, कान, मांजरा, पंचगंगा, पंजारा, रंगावली, सावित्री, सूर्य, तानसा, उल्हास, वैतरणा, वशिष्टी
ही माहिती जलशक्ती व सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी राज्यसभेत आज लेखी उत्तरात दिली.