मुंबईत ताजेतवाने करणाऱ्या मोकळ्या हवेचा श्वास: मुसोने मुलांना निसर्गाशी पुन्हा जोडण्यासाठी सुरू केले ‘ग्रो लॅब’
मुंबई : मुंबईच्या गजबजलेल्या शहरी वातावरणाच्या मध्यभागी मुलांना निसर्गाच्या अद्भुत जगाशी पुन्हा जोडण्यासाठी एक हिरवागार परिसर निर्माण करण्यात आला आहे. म्युझियम ऑफ सोल्युशन्स (MuSo) ने एक अनोखी, गुंगवून टाकणारी हरित जागा ‘ग्रो लॅब’ सुरू केली आहे. येथे मुलांना परिसंस्थांमधील जटिल संबंध आणि ते जीवन कसे टिकवतात याचे प्रत्यक्ष अनुभव मिळतील. प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या शिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना जैवविविधता, पर्यावरणपूरक शेती, जलसंवर्धन आणि कचरा व्यवस्थापन शिकता येईल. तसेच स्थानिक वनस्पतींचे पक्षी, मधमाश्या आणि निसर्गाच्या चक्रातील अन्य महत्त्वाच्या जीवांचा समावेश असलेल्या स्थानिक वन्यजीवांच्या संदर्भात असलेले महत्त्वही समजेल.
MuSo च्या गच्चीवर स्थित ‘ग्रो लॅब’ ही अशी एक जागा आहे जिथे मुलांना निसर्ग आणि शाश्वतता यांचा अनुभव घेता येतो. समाज आणि एकूणच जगावर सकारात्मक परिणाम घडवण्यास लहान आणि तरुण मुलांना सक्षम करत MuSo च्या ‘मुलांच्या नेतृत्वाखालील आणि हेतूपूर्ण शिक्षणाच्या’ ध्येयाशी सुसंगत असलेले हे ग्रो लॅब मुलांना पर्यावरणाबाबत सखोल जाणीव प्रस्थापित करण्यास मदत करते.
MuSoच्या सह-संस्थापिका तन्वी जिंदाल शेटे म्हणाल्या, “ग्रो लॅबचा प्रारंभ हा बालपणापासूनच पर्यावरणाविषयी जागरूकता रुजवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. मुलांना जागतिक दर्जाच्या शिकण्याच्या संधी मिळतील हे सुनिश्चित करत MuSo मध्ये आम्ही नाविन्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आणि जागतिक स्तरावर प्रेरित असे अनुभव तयार करण्यावर विश्वास ठेवतो. TIME मॅगझिनच्या ‘आवर्जून भेट द्यायलाच हवी अशा आघाडीच्या १०० जागा’ या यादीत आम्हाला मिळालेले स्थान आणि Children’s Museum Award मुळे अनुभवाधारित शिक्षण भारतात आणण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळ मिळाले आहे. ग्रो लॅबच्या माध्यमातून, आम्ही शाश्वततेवर आधारित शिक्षणामध्ये नवे मापदंड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यायोगे पुढील पिढीतील परिवर्तन घडवू शकणाऱ्या व्यक्तींमध्ये जिज्ञासा आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल.”
निसर्गाचे वर्ग: ग्रो लॅबची वैशिष्ट्ये
ग्रो लॅब ही एक चैतन्यमय, मोकळा श्वास घेता येऊ शकेल अशी जागा आहे. येथे मुलांना निसर्गाला स्पर्श करण्याची, अनुभवण्याची आणि त्याच्याशी परस्परसंवाद करण्याची संधी मिळते. विशेषतः मुंबईसारख्या महानगरात अशी संधी मिळणे दुर्मिळ आहे. यामध्ये खालील प्रमुख वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत:
- विव्हेरियम (Vivarium): कीटकांसाठी संरक्षित जागा. अशी जागा जैवविविधता वाढवते आणि परागीकरणामध्ये कीटकांची भूमिका किती महत्त्वाची असते याबद्दल मुलांना शिकवते.
- शाश्वत शेती आणि बागकाम: मातीमध्ये हात घालणे, बिया पेरणे आणि झाडांची वाढ पाहणे यासारख्या प्रत्यक्ष अनुभवांद्वारे निसर्गाशी जवळीक निर्माण होते.
- कंपोस्टिंग स्टेशन: कचरा व्यवस्थापनाचे वास्तववादी व्यावहारिक शिक्षण. येथे सेंद्रिय कचऱ्याचे पोषणयुक्त खतामध्ये रूपांतर कसे होते हे शिकता येते.
- बीज आणि साधन केंद्र: आपल्या ताटात येणारे अन्न कुठून येते आणि आपल्या शेतकऱ्यांनी त्यासाठी कोणती साधने वापरली याचा सखोल अभ्यास.
- संवेदनात्मक मार्ग (Sensory Pathway): गवत, खडी आणि मातीवर अनवाणी चालणे, विविध पोतांचा अनुभव घेणे आणि ताज्या गवती चहा, पुदिना यांसारख्या वनस्पतींचा वास घेण्याचा आनंददायी अनुभव मिळविणे. निसर्गाच्या साध्या पण आनंददायक गोष्टींची आठवण करून देणारा उपक्रम.
निसर्गाची जादू पुन्हा अनुभवताना
ग्रो लॅब हा MuSoच्या ‘Rediscover Nature’s Magic’ मोहिमेचा एक भाग असून मुलांना आणि प्रौढांना निसर्गाच्या जादूशी पुन्हा जोडण्यासाठी तयार करण्यात आला आहे. गवतावर अनवाणी चालण्याचा आनंद, आपल्या पायांखाली असलेल्या मातीची, जमिनीची जाणीव आणि निसर्गाच्या सौंदर्याचं खरं कौतुक असा हा पुनरुज्जीवनासाठीचा उपक्रम आहे. मुलांना प्रत्यक्ष शाश्वततेशी संबंधित अनुभवांद्वारे ग्रो लॅब जबाबदारी, सहानुभूती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता वाढवते.
शिक्षण आणि शाश्वततेतील नेतृत्व
हवामान बदलाच्या वाढत्या समस्या पाहता, ग्रो लॅबसारखे उपक्रम पुढील पिढीला या समस्यांचे आकलन आणि हरित भविष्याकरता उपाय समजून घेण्यासाठी प्रेरित करतात. MuSo च्या शाश्वत शिक्षणाबाबतच्या वचनबद्धतेमुळे मुलांना निसर्गाशी खोलवर जोडणाऱ्या आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या अनुभवांचा लाभ होतो.
कुटुंब, शाळा आणि छोट्या मंडळीना निसर्गाच्या जादूचा पुनःअनुभव घेण्यासाठी निमंत्रण देत ग्रो लॅब आता म्युझियम ऑफ सोल्युशन्समध्ये खुले आहे!