रत्नागिरी जिल्हा विधी न्याय प्राधिकरण, वनविभाग व जिल्हा प्रशासनाने केले वृक्षारोपण
रत्नागिरी : जिल्हा विधी व न्याय प्राधिकरण रत्नागिरी, सामाजिक वनीकरण विभाग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये आज वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश आर.एस.जोशी व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वृक्षारोपण केले. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधीश -१ रत्नागिरी एल.डी. भिले, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सामंत, विभागीय वन अधिकारी प्रियांका लगड तसेच न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपण व वृक्ष संगोपनाचे महत्व यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सर्व उपस्थितांना सांगितले. यावेळी जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये सुमारे शंभर झाडे लावण्यात आल्याचे जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश जोशी यांनी सांगितले.