फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेची एसएफआयच्या वतीने जनजागृती
कोल्हापूर : फ्रायडे फॉर फ्युचर मोहिमेबाबत एसएफआयने सोमवारी वि.स.खांडेकर प्रशाला, शाहूपुरी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
स्वीडनची १६ वर्षे वयाची विद्यार्थीनी ग्रेटा थनबर्ग हिने जागतिक तापमान वाढीकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन केले. त्यानंतर जागतिक पातळीवर तापमानवाढीचा मुद्दा चर्चेला आला आहे. ग्रेटा थनबर्ग हिने सुरू केलेले आंदोलन जगभर पसरले असून जगातील असंख्य विद्यार्थी पर्यावरण प्रश्नाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. २० सप्टेंबरला १ वर्षे पुर्ण झाले. २० ते २७ सप्टेंबर २०१९ दरम्यान जगभरातील लाखो तरूण पर्यावरणाचा ऱ्हास आणि बदलांचा विरोध करण्यासाठी संप आणि निदर्शने करणार आहेत. त्यासाठी ग्लोबल क्लायमेट स्ट्राईक संदेश पोहोचविण्यासाठी जनजागृती करण्यात आहे. असे एसएफआय राज्य सचिवमंडळ सदस्य नवनाथ मोरे यांनी माहिती दिली.
पुरामुळे सांगली–कोल्हापूरमध्ये लोकांचं जनजीवन विस्कळीत झाले. यावरून संपूर्ण मानवजात इतक्या अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे की त्यापासून पृथ्वीला वाचवण्यासाठी आपल्याजवळ फक्त १० ते १५ वर्षंच उरली आहेत. तापमानवाढ थांबविण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. एवढं नक्की फक्त वृक्ष लावून चालणार नाही, तर ती जगविणे गरजेचे आहेत, असे एसएफआय चे रत्नदिप सरोदे म्हणाले.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.