शिवसेनेच्यावतिने भांडुप रोड स्वच्छता मोहिम, विद्रुप झालेला परिसर स्वच्छ करण्यात आला
मुंबई : स्वच्छ परिसर सुंदर परिसर ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य असते. रस्त्यावर कचरा करणारे फेरीवाले असो वा पादचारी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे असते. मात्र असे होताना दिसत नाही. शहर स्वच्छ ठेवणे हे केवळ पालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्त्यव्य असते. यासाठी शिवसेनेच्यावतिने भांडुप स्टेशन रोड परिसर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. वर्षांनुवर्षे भिंतीवर लावण्यात आलेले स्टिकर पालिका कर्मचा-यांनी काढून टाकले. त्याच बरोबर रस्त्यावर टाकण्यात आलेला कचरा उचलुन परिसर नुकताच स्वच्छ करण्यात आला. या अभियानात युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी सहभाग घेतला.
भांडुप पश्चिमेला असलेल्या फेरीवाली तसेच पादचा-यांकडून रस्त्यावर कचरा टाकला जातो. शिवाय अनेक कंपन्याकडून आपल्या वस्तुंच्या जाहिराती भिंतींवर चिटकवून शहर विद्रुप करुन टाकतात. यासाठी शिवसेनेच्यावतिने भांडुप रोड परिसर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील, शिवसेना विभाग प्रमुख रमेश कोरगावकर यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन हा परिसर स्वच्छ करण्यात आला. पालिका कर्मचा-यांच्या मदतीने भांडुप स्टेशन ते एलबीएस मार्गापर्यत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. पाण्याचा वापर करुन तसेच भिंतीवर चिटकविण्यात आलेल्या जाहिराती काढून टाकण्यात आल्या. त्यामुळे हा परिसर नेहमी पेक्षा स्वच्छ, सुंदर दिसत आहे. नागरिकांनी रस्त्यावर कचरा न टाकता, कचरा पेटीचा वापर करावा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन राजोल संजय पाटील यांनी केले आहे.