पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खा. संजय दिना पाटील यांचा पुढाकार;दिड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन सुरू, कृत्रीम तलावाला प्रतिसाद
मुंबई, दि. २८ (प्रतिनिधी) पर्यावरणाचा समतोलपणा राहावा म्हणुन सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश मुर्ती या शाडू पासून तयार करण्यात याव्यात म्हणुन पालिकेने मुर्तीकरांना आवाहन केले होते. शिवाय हजारो टन शाडूमाती मुर्तीकारांना मोफत देण्यात आली होती. काही ठिकाणी गणेश मुर्तीमुळे पर्यावरणाला हानी पोहचू नये म्हणुन काही पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली होती. त्यावर पर्याय म्हणुन गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यात कृत्रीम तलावाची निर्मिती केली जात आहे. पालिकेने मुंबईत सर्व ठिकाणी लहान मुर्तींच्या विर्सजनासाठी कृत्रीम तलाव तयार केले असून या तलावात मुर्तींचे विसर्जन करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावतिने भांडुप पश्चिम येथे कृत्रीम तलाव बांधण्यात आला आहे. आज दुपार पासूनच दिड दिवसांच्या मुर्तींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले.
इको फ्रेंडली कृत्रीम तलावाची निर्मिती यंदा सर्व ठिकाणी करण्यात आली असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गेल्या काही वर्षापासून हा प्रयत्न केला जात आहे. मोठ मोठ्या गणेश मुर्तीच्या विसर्जनानंतर समुद्र किंवा नदी, तलावात केमीकल युक्त रंगामुळे मोठ्या प्रमाणावर मासे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याने गणेश मुर्तींचा आकार लहान करण्याबाबत गेले काही वर्षे यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे नदी, तलाव या ठिकाणी लहान गणेश मुर्तींचे विसर्जन करण्याऐवजी कृत्रीम तलावात विसर्जन करण्यात यावे, अशी विनंती पालिकेतर्फे करण्यात येत आहे. त्यासाठी सर्व ठिकाणी कृत्रीम तलाव बांधण्यात आले आहेत. भांडुप पश्चिम येथे ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांच्यावतिने कृत्रीम तलाव बांधण्यात आला असून दुपार पासून या तलावात गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. सर्व गणेश भक्तींनी कृत्रीम तलावाचा वापर गणेश विसर्जनासाठी करावा, यावा असे आवाहन युवासेना कार्यकारणी सदस्य राजोल संजय पाटील यांनी केले आहे.