टोयोटा किर्लोस्कर मोटरने शाश्वततेप्रती आपली कटिबद्धता दृढ केली
मुंबई : जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचे औचित्य साधून टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आज भारतात पर्यावरणीय स्थिरता आणि सामाजिक स्वास्थ्याला चालना देण्याप्रती आपली दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ केली. २०१५ मध्ये घोषणा करण्यात आलेल्या जागतिक टोयोटा एन्व्हायरोन्मेंट चॅलेंज २०५० (टीईसी २०५०)मध्ये सहा आव्हानांचा समावेश आहे. टीईसी २०५० मधून मार्गदर्शन घेत टीकेएम आपले कार्बन उत्सर्जन कमी करत आहे, ज्यामुळे परिवर्तनाला गती मिळत आहे, ज्यासाठी ते उत्पादनांच्या पलीकडे जात आहेत, उत्पादन कार्यसंचालनांमध्ये आणि त्यांच्या संपूर्ण मूल्य साखळीमध्ये शाश्वत पद्धतींचा अवलंब करत आहेत. तसेच, अशा पर्यावरणासंबंधित प्रयत्नांमध्ये नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि प्रभावी प्रकल्पांच्या माध्यमातून समुदायाची प्रगती यांचा समावेश आहे.
जागतिक पर्यावरण आरोग्य दिन पर्यावरणाचा दर्जा आणि सार्वजनिक आरोग्यामधील अपरिहार्य संबंधाची आठवण करून देतो. शुद्ध हवा व पाणी, प्रभावी कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रणाला चालना देत हा दिवस निदर्शनास आणतो की पर्यावरणाचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या बाबीशी संलग्न राहत टीकेएमचे शाश्वतता उपक्रम उत्सर्जन कमी करण्यावर व संसाधनांचे जतन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासोबत आरोग्यदायी समुदायांप्रती देखील योगदान देतात.
‘रिस्पेक्ट फॉर प्लॅनेट’ (पर्यावरणाचा आदर) या तत्त्वाशी बांधील राहत टीकेएमने आपला उत्पादन पोर्टफोलिओ, उत्पादन प्रक्रिया आणि समुदाय पोहोच उपक्रमांमध्ये नाविन्यता व विकासात्मक ध्येयांचा समावेश केला आहे, ज्यामधून सर्वोत्तम व मोठ्या प्रमाणात निष्पत्तींची खात्री मिळते.
टोयोटा किर्लोस्कर मोटरचे कार्यकारी उपाध्यक्ष व संचालक श्री. बी. पद्मनाभ म्हणाले, ”टीकेएममध्ये शाश्वतता आमची कार्यसंचालन करण्याच्या, नाविन्यता आणण्याच्या आणि विकास करण्याच्या पद्धतींचा पाया आहे. गेल्या वर्षभरात आम्ही विविध पैलूंमध्ये निर्णायक प्रगती केली आहे, बिदादी कार्यसंचालनांमध्ये १०० टक्के नवीकरणीय ऊर्जा संपादित केली आहे, मूल्य साखळीमध्ये डिकार्बनायझेशनला चालना देत आहे आणि चक्रिय अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे. आमच्या प्रयत्नांच्या माध्यमातून, तसेच आमच्या दूरवर पोहोचणाऱ्या समुदाय उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही लाखो व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. आमचे सहयोगी, भागधारक व कर्मचाऱ्यांसोबत सहयोगाने आम्ही भारत व त्यापलीकडे शाश्वत भविष्याचा आराखडा निर्धारित करण्यामध्ये मदत करत आहोत.”
बिदादी प्लांट येथे टीकेएम २०३५ पर्यंत उत्पादन कार्यसंचालनांमध्ये निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाकडे सातत्याने वाटचाल करत आहे, तसेच २०५० पर्यंत संपूर्ण मूल्य साखळीत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याप्रती कटिबद्ध आहे.
कार्बन न्यूट्रॅलिटीप्रती बहुमार्गीय दृष्टिकोनांतर्गत टीकेएम इलेक्ट्रिफाईड तंत्रज्ञानांमध्ये, तसेच भारतातील अद्वितीय ऊर्जा क्षेत्रासाठी अनुकूल असलेल्या हायब्रिड इलेक्ट्रिक, प्लग-इन हायब्रिड इलेक्ट्रिक, फ्यूइल सेल इलेक्ट्रिक आणि बॅटरी इलेक्ट्रिक वेईकल्समध्ये गतीशीलता सोल्यूशन्स देत आहे. कंपनी इलेक्ट्रिकफाईड फ्लेक्स-फ्यूईल वेईकल्स (ईएफएफव्ही)ना देखील प्रगत करत आहे, सुधारित कार्यक्षमता व कमी उत्सर्जन देण्यासाठी भारताची जैवइंधन ध्येये व शक्तिशाली हायब्रिड यंत्रणांना एकत्र करत आहे. २०२३ दरम्यान टीकेएमने सर्वात प्रशंसित इनोव्हा हायक्रॉसवर आधारित इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स फ्यूईल वेईकलचा प्रोटोटाइप लाँच केला आणि भारताच्या उच्च उत्सर्जन नियमांशी सुसंगत असण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. ज्यामुळे हा जगातील बीएस ६ (स्टेज २) इलेक्ट्रिफाइड फ्लेक्स फ्यूइल वेईकलचा पहिला प्रोटोटाइप आहे.