मार्वे येथील परेरा वाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण
मालाड, ता.1 (वार्ताहर) : मार्वे येथील परेरा वाडीत वृक्षारोपण कार्यक्रम झाला. वॉर्ड क्रमांक 32 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उत्तर जिल्हा अध्यक्ष इंद्रपाल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आलं. प्रसंगी दिनकर तावडे, प्रिया बांदिवडेकर, विजय शेट्टी, परशुराम शर्मा तसेच सर्व वॉर्ड अध्यक्ष व पदाधिकारी, स्थानिक गावकरी उपस्थित होते. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा पण करत पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली.