केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दत्तक घेतला बिबळ्या
केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी दत्तक योजनेतून बिबळ्या दत्तक घेतलाय.
Mumbai : मागील 7 वर्षांपासून रामदास आठवले आणि त्यांचा सुपुत्र जित आठवले हे बिबळ्या दत्तक घेत आहेत. बिबळ्या वाघ दत्तक घेण्यासाठी वर्षभरासाठी 1लाख 20 हजार रुपये खर्च येतो. हा खर्च दरवर्षी रामदास आठवले हे वनविभागाला सुपूर्द करत असतात.
रामदास आठवले यांनी दत्तक घेतलेल्या बिबळ्याचे नाव सिंबा ठेवण्यात आले आहे. रामदास आठवलेंनी सींबा थांब अशी हाक देताच सिम्बा थांबला. हे पाहून उपस्थितांना ही आश्चर्य वाटले.
रामदास आठवले यांन दलित पँथर चळवळीतून आपली राजकीय प्रवास सुरु केला. प्राणीमात्रांवर प्रेम करा, प्राण्यांचे रक्षण करा, निसर्गावर प्रेम करा असा संदेश देण्यासाठी आपण दरवर्षी पँथर दत्तक घेत असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
रामदार आठवले यांनी आज जेव्हा हा पँथर दत्तक घेतला तेव्हा त्यांच्यासोबत वनविभागाचे वन संचालक, उपसंचालक, सीमाताई आठवले आणि तसेच सर्व आठवले कुटुंबीय उपस्थित होते.