मेथनॉलचा वापर हरित वायू उत्सर्जन कमी करु शकतो
नवी दिल्ली : एम-15 हे 15 टक्के मेथनॉल आणि 85 टक्के गॅसोलिनचे मिश्रण आहे. बीएस-आयव्ही गाड्यांमध्ये मिश्रित एम-15 इंधनाचा वापर केल्यास हरित वायू उत्सर्जन सुमारे 5 ते 10 टक्क्यांनी कमी होऊन हवेची गुणवत्ता सुधारु शकते. एम-15 इंधन मिश्रण पर्याय म्हणून उपलब्ध आहे. मात्र नजीकच्या भविष्यात हे मिश्रण बंधनकारक करण्याचा प्रस्ताव नाही.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.