चिपळूणमध्ये 11 फुट लांब अजगराला पकडले
रत्नागिरी : चिपळूण मध्ये 11 फुट लांब अजगर पकडण्यात आला. त्याची तपासणी करून नैसर्गिक अधिवासात त्याला सोडण्यात आले.
पेढे गावातील माळीवाडी येथील निशिकांत माळी यांच्या घराशेजारी हा अजगर दिसला.
लांबच लांब अजगर आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. माळी यांच्या घराशेजारी अजगर असल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे रामदास खोत व वन्यजीवप्रेमी अनिकेत चोपडे, प्रणित चोपडे, सिद्धेश कुडाळकर हे तातडीने घटनास्थळी पोहचले. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर या अजगराला पकडण्यात आले. अजगर 310 सेंटीमीटर लांब असून मादी आहे.