8 जून रोजी कोकणच्या पर्यावरणीय अस्तित्वासाठी ‘कोकणची कैफियत’ परिसंवाद; कोकणप्रेमींना उपस्थितीचे आवाहन
मुंबई, दि. ८ जून : कोकणातील पर्यावरणीय, सामाजिक आणि विकासविषयक प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून आणण्यासाठी ‘कोकणची कैफियत’ या परिसंवादाचे आयोजन १३ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रा. सुरेंद्र गावसकर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर (पूर्व) येथे करण्यात आले आहे.
अरबी समुद्राच्या साक्षीने आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कोकण प्रदेशासमोर आज रिफायनरी, अणुऊर्जा व अन्य प्रदूषणकारी प्रकल्प, पर्यावरणाचा ऱ्हास, वैध-अवैध खाणकाम, परप्रांतीय ट्रॉलर्सकडून होणारी मासेमारीची लूट, स्थानिक रोजगाराची उणीव, शिक्षण व आरोग्य सुविधांचा अभाव, शेती व पर्यटन व्यवसायासमोरील अडचणी तसेच रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग यांसारखी गंभीर आव्हाने उभी आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणच्या पर्यावरणीय आणि विकासविषयक प्रश्नांवर व्यापक चर्चा करण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्ष, कोकण जनविकास समिती आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती (मास) यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
या उपक्रमासाठी प्रभाकर नारकर, संजय परब, विश्वास उटगी, जगदीश नलावडे, सुरेश रासम, ॲड. प्रशांत गायकवाड, पत्रकार काशीनाथ म्हादे, दिनेश राणे, चित्रा राणे, डॉ. उत्तम महाडकर, जयंत दिवाण, ॲड. गिरीशकुमार कटारिया, किशोर केदार, संजीवकुमार सदानंद, केतन कदम, जगदीश पाटणकर, विजय परब, ॲड. निरंजनी शेट्टी, संभाजी भोसले, रमेश बोरीचा, जनार्दन जंगले, राजन नेरुरकर, डॉ. आनंद कासले, नितीन माळी, शिवराम सुकी, दिनार कवीश्वर, घनश्याम अंबोकर, साजिद शेख, गणेश शिर्के, उल्हास चौधरी, ललिता सोनावणे, रविंद्र निकाळे, गौतम साळवे, काशिनाथ म्हादे, भूषण भिसे, यतीन तोंडवळकर, अमर जोशी, लालजी कोरी आणि विनोद गायकवाड हे कार्यरत आहेत.
कोकणच्या पर्यावरणीय अस्मितेचे रक्षण, स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि शाश्वत विकासाचा मार्ग निश्चित करण्यासाठी या परिसंवादाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






