मृतावस्थेत आढळली मादी बिबट्या ; राजापूरमधील घटना
रत्नागिरी : राजापूर तालुक्यामध्ये एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळली. तालुक्यातील आडवली-फुफेरे रोडवर ती सापडली. गावातील दिलीप जाधव यांना मादी बिबट्या मृतावस्थेत दिसल्यांनतर त्यांनी वनविभागाला माहीती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यानी घटनास्थळी येऊन तिची पाहणी केली. वाहनाच्या धडकेनं तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मादीचे वय साडेतीन ते चार वर्ष आहे.