मुंबई, 28 जुलै : रेल्वे मंत्रालयाच्या धोरणाच्या अनुषंगाने २०३० पर्यंत पूर्णपणे हरित होण्याच्या दृष्टीने हवामान बदलात कार्बन फूटप्रिंट कमी करून आणि ग्लोबल वार्मिंग कमी करण्यासाठी मध्य रेल्वे ओपन ॲक्सेस आणि नेट मीटरिंगद्वारे उर्जेचा खर्च कमी करण्यासाठी पर्यावरणास अनुकूल सौर आणि पवन ऊर्जा यासारख्या नूतनीकरणयोग्य उर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील आहे. मध्य रेल्वे रूफटॉप कॉन्फिगरेशन तसेच लँड बेस्ड सौर उर्जा आणि पवन उर्जा या दोन्हींच्या निर्मितीसाठी काम करीत आहे.
रूफटॉप सौर उर्जा संयंत्र
मध्य रेल्वेने आपल्या ५ विभागांत आणि ४ कार्यशाळांमध्ये एकूण १४.३७९ मेगावॅट (MWp मेगा-वॅट पीक) क्षमता असलेल्या रूफटॉप सौर उर्जा प्रकल्पांसाठी योजना आखली आहे. त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, पुणे आणि विविध ईएमयू कारशेड्स, कार्यशाळा व प्रशासकीय/सेवा इमारतींसह विविध रेल्वे स्थानकांच्या फलाटांच्या छतावर ४.९२ मेगावॅट क्षमतेच्या संयत्राची स्थापना आणि कार्यान्वित करण्यात आली आहे. या आस्थापनांमधून दरवर्षी ६.४ दशलक्ष युनिट्स ऊर्जेची निर्मिती होत असून परिणामी वर्षाकाठी ४.१ कोटी रुपयांची बचत होते आहे. उर्वरित सौर उर्जा प्रकल्प स्थापनेच्या विविध टप्प्यात आहेत जे चालू झाल्यावर १२ दशलक्ष युनिट उत्पादीत होतील ज्यामुळे वर्षाकाठी ७.३७ कोटी रुपये वाचतील.
जमीनीवरील सौर उर्जा प्रकल्प
ट्रॅकच्या बाजूला असलेली मोकळी जमीन आणि इतर रिक्त जागांचा वापर करण्यासाठी मध्य रेल्वेने ट्रॅक्शन वापरासाठी एकत्रित १०९ मेगावॅट क्षमतेच्या उर्जा प्रकल्पांची स्थापना करण्यासाठी रूळा शेजारील मोकळा पट्टा तसेच विनाउपयोगित जमीन लँड बेस्ड सौर उर्जा निर्मितीसाठी निश्चित केली आहे. याठीकाणी वर्षाकाठी १४३ दशलक्ष युनिट ऊर्जा उत्पादन होईल. यामुळे वर्षाकाठी उर्जा बिलात ४३ कोटी रुपयांची बचत होईल. त्याचप्रमाणे, ट्रॅक्शन व्यतिरिक्त हेतूंसाठी, मोकळ्या जमीनीचे भूभाग विविध ठिकाणी निश्चित केले आहेत. ज्यावर एकूण ७१ मेगावॅट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पांची योजना आखली गेली आहे. ज्यामुळे वर्षाकाठी ९३ दशलक्ष युनिट उर्जा उत्पादन होईल आणि वर्षाकाठी ₹ ६४ कोटी रुपयांची बचत होईल. अशाप्रकारे, वार्षिक खर्चाच्या बिलातील एकूण बचत ₹ १०७ कोटी असेल.
पवन ऊर्जा
पवन उर्जा,अन्य अक्षय उर्जा स्त्रोत देखील पवन ऊर्जा विकसकांसमवेत वीज खरेदी कराराद्वारे (पीपीए) मेसर्स रेलवे एनर्जी मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (आरईएमसीएल) च्या वतीने संभाव्य करण्यात आली आहे. सांगली येथे ट्रॅक्शन वापरासाठी एकत्रीत ५०.४ मेगावॅट क्षमतेची पवन मिल स्थापित केली आहे तर नॉन-ट्रॅक्शन वापरासाठी एकत्रित ६ मेगावॅट क्षमतेची पवन मिल स्थापित केली आहे.
ओपन ॲक्सेस नियमांतर्गत तयार केलेली उर्जा मध्य रेल्वेच्या ड्रॉवल पॉइंट्स वर दिली जाते. यात, पॉवर ग्रिडमधील कोणत्याही ठिकाणी पॉवर इंजेक्ट केली जाते आणि पॉवर ट्रांसमिशन यूटिलिटीचा वहन शुल्क भरुन इतर कोणत्याही पॉईंटवर काढली जाते. आतापर्यंत ६७.७६ दशलक्ष युनिट ऊर्जा प्राप्त झाली असून त्यातून ३९ कोटी रुपयांची बचत झाली आहे. नॉन-ट्रॅक्शनसाठी पवन ऊर्जा विकसकांसह पीपीएच्या माध्यमातून ६ मेगावॅट क्षमतेच्या संयंत्रासाठी स्वाक्षरी झालेली असून २०२०-२१ मध्ये चालू झाल्यावर वार्षिक सुमारे ₹ ४.२ कोटी ची बचत होईल.
मध्य रेल्वेने ऊर्जा बचत प्रमाणपत्रे ( एनर्जी सेव्हिंग सर्टीफिकेट) मिळविली
मध्य रेल्वेने पीएटी -II सायकल (परफॉर्म, अचिव्ह एंड ट्रेड) दरम्यान राबविण्यात येणा-या ट्रेन ऑपरेशनमध्ये ऊर्जा कार्यक्षमतेने २०,१७९ ऊर्जा बचत प्रमाणपत्रे (ईएससर्ट्स) ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी (बीईई) च्या वाढीव ऊर्जा कार्यक्षमता राष्ट्रीय मिशन (नेशनल मिशन फार एन्हान्स्ड एनर्जी एफीसिएन्सी) अंतर्गत २०१९ मध्ये साध्य केली आहेत. झोनल रेल्वेमधील दुसर्या क्रमांकाची ऊर्जा बचत प्रमाणपत्रे मध्य रेल्वेने मिळविली आहेत.
पीएटी (परफॉर्म, अचिव्ह एंड ट्रेड) योजना हा देशातील विशिष्ट ऊर्जा प्रोत्साहन उद्योगांमध्ये, उर्जा वापर कमी करण्यासाठी आणि वाढीव ऊर्जा कार्यक्षमतेला चालना देण्यासाठी बीईईने सुरू केलेला एक उपक्रम आहे. या योजनेंतर्गत विशिष्ट ऊर्जेचा वापर करणाऱ्यामध्ये कपात बचतीचे लक्ष्य ३ वर्षाच्या चक्रात नियुक्त ग्राहकाना देण्यात आले आहेत. इंडियन एनर्जी एक्सचेंज (आयईएक्स) आणि पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेड (पीएक्सआयएल) या दोन एनर्जी एक्सचेंजमध्ये व्यवहार केले जाऊ शकतात किंवा पीएटी अंतर्गत इतर युनिट्सद्वारे खरेदी केलेल्या ऊर्जा बचत प्रमाणपतत्रे आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी वापरु शकतात