मुंबई, (निसार अली) : समुद्रातून वाहून आलेले प्लास्टीक आणि कचरा यामुळे अस्वच्छ झालेल्या मढ समुद्र किनाऱ्यावर 9 जुलै मंगळवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. किनाऱ्यावर प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच होता. तसेच कचर्यामुळे दुर्गंधी पसरली होती. पर्यटकांनाही त्रास सहन करावा लागत होता. समुद्र किनारा स्वच्छ असावा, यासाठी ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
इंफॅन्टजीजस शाळेचे विद्यार्थी, नगरसेवक वीरेंद्र चौधरी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नेक्शन नाटके,संतोष कोळी, आशुतोष मिश्रा, हैदर अली आदी सहभागी झाले होते.
“या किनार्यावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा जमा झाला होता, यामुळे किनार्याचे विद्रुपीकरण झाले होते. प्लास्टीकमुळे पर्यावरणाचीही हानी होत होती. ही हानी होऊ नये, किनारा सुंदर दिसावा यासाठी आम्ही स्वच्छता मोहीम राबविली,” अशी माहिती ऎड. विक्रम कपूर यांनी दिली