हवामान आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज: दिया मिर्झा; वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिटची यशस्वी सांगता
मुंबई : द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) द्वारे आयोजित वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट (डब्ल्यूएसडीएस) २०२५ च्या २४व्या पर्वाची तीन दिवसांच्या माहितीपूर्ण वादविवाद, धोरणात्मक धोरण संवाद आणि धाडसी जागतिक कटिबद्धतेनंतर सांगता झाली, ज्यामध्ये शाश्वतता आणि हवामान स्थिरतेसाठी जागतिक अजेंडा अधिक मजबूत करण्यात आला. ‘डब्ल्यूएसडीएस@२५ आणि बहुभागधारक चर्चांच्या माध्यमातून प्रभावाला चालना’ या समारोप सत्रात शाश्वततेसंदर्भातील गुंतागुंतीची आव्हाने आणि पर्यावरणीय समस्यांना तोंड देण्यासाठी सहयोगात्मक भागीदारीची महत्त्वपूर्ण भूमिका निदर्शनास आली.
अभिनेत्री, निर्माती, युएनईपी गुडविल अॅम्बेसेडर आणि एसडीजीसाठी युनायटेड नेशन्सच्या महासचिवांच्या अधिवक्त्या श्रीमती दिया मिर्झा यांनी आपल्या बीजभाषणात हवामान आव्हानांचा सामना करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक कृतीच्या सामर्थ्यावर भर दिला. त्या म्हणाल्या, ”पुढील मार्ग सोपा नाही. आव्हाने असतील आणि शंकांचे क्षणही येतील. पण आपण एकत्र काम केले, न्याय, समता आणि शाश्वतता या आपल्याला प्रेरित करणाऱ्या मूल्यांशी कटिबद्ध राहिलो तर मला विश्वास आहे की, आपण या क्षणाला आवश्यक असलेल्या निकडीने आणि दृढनिश्चयाने सामोरे जाऊ शकतो. मी उपायांबद्दल विचार करते तेव्हा मी ऍक्टफॉरअर्थबद्दल विचार करते, ही एक चळवळ आहे, जी माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. ही चळवळ पुनर्चक्रण किंवा वृक्षारोपणासाठी प्रेरित करण्यासोबत आपल्याला पृथ्वीची काळजी घेण्याचे आवाहन देखील करते. ही चळवळ पर्याय आहे, जी पर्यावरणाचे आणि आपण विश्वासोबत साधणाऱ्या संवादाचे संरक्षण करते. ऍक्टफॉरअर्थ आपल्यापैकी प्रत्येकाला पर्यावरणावरील परिणामाची जबाबदारी घेण्यास आणि परिवर्तनाला सक्रियपणे पाठिंबा देण्यास प्रेरित करते.”
शेवटच्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात टेरीचे अध्यक्ष श्री. नितीन देसाई यांच्या भाषणाने झाली. त्यांनी दीर्घकालीन पर्यावरणीय आणि विकासात्मक परिणाम घडवून आणण्यासाठी विविध भागधारकांमध्ये सतत संवादाची आवश्यकता निदर्शनास आणली. ते म्हणाले, ”शाश्वत विकास हा विकास समुदाय आणि पर्यावरण समुदाय या दोन ज्ञानविषयक समुदायांमध्ये दुवा म्हणून काम करतो. थोडक्यात, हे शाश्वततेचे खरे आव्हान आहे: पर्यावरणाचे संरक्षण करताना आपण विकास कसा साध्य करू शकतो? हे सोपे काम नाही.”
एका विशेष ‘ग्लोबल लीडरशिप’ (व्हिडिओ संदेश)मध्ये युनायटेड नेशन्सच्या उपमहासचिव श्रीमती अमिना जे. मोहम्मद यांनी जागतिक हवामान कृतीसाठी युनायटेड नेशन्सच्या कटिबद्धतेची पुष्टी केली आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (एसडीजी)च्या दिशेने प्रगतीला गती देण्याच्या गरजेवर भर दिला. त्यांनी आज जगासमोर असलेल्या संबंधित हवामान समस्यांबद्दल मत केले आणि म्हणाल्या, ”अपेक्षा वाढत आहेत आणि आपण विक्रमी सर्वात उष्ण वर्षे पाहिली आहेत, कार्बन डायऑक्साइडची पातळी सतत वाढत आहे. पण आपण आशा सोडू शकत नाही किंवा आपल्या महत्त्वाकांक्षा कमी करू शकत नाही. व्यक्ती, पर्यावरण आणि समृद्धीसाठी कृती योजना म्हणून एसजीडींना प्राधान्य देण्याची वेळ आली आहे.”
वर्ल्ड बँकेचे उपाध्यक्ष श्री. मार्टिन रेजर यांनी हवामानविषयक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाश्वत वित्तपुरवठा आणि जागतिक सहयोगाचे महत्त्व निदर्शनास आणले. ते म्हणाले, ”डब्ल्यूएसडीएस उत्तम संधी आहे आणि आपण पाहू इच्छित असलेल्या परिवर्तनाला चालना देण्यासाठी संकल्पना आणि अनुभवांचे प्रतीक आहे. आम्ही गुंतवणूक व रोजगारवाढीचा स्रोत म्हणून हरित परिवर्तनाला प्राधान्य देतो. भारतातील व्याप्ती व उद्योजकता टॅलेंट, तसेच गरजेमुळे हरित परिवर्तनाला चालना देण्यासाठी जगामध्ये भारतासारखा दुसरा उत्तम देश नाही, कारण भारत हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करणाऱ्या सर्वात असुरक्षित देशांपैकी एक आहे. कुटुंबे आणि व्यवसायांच्या अनुकूलतेच्या दृष्टीने संसाधनांच्या पुनर्वाटपाच्या बाबतीत आपल्याला स्थिरतेचा विचार करण्याची आवश्यकता आहे.”
टेरीच्या डब्ल्यूएसडीएसच्या क्यूरेटर डॉ. शैली केडिया यांनी अॅक्ट४अर्थ २०२५ जाहीरनाम्याचे अनावरण करताना कृतीयोग्य कटिबद्धतेप्रती दृष्टिकोन मांडला आणि डब्ल्यूएसडीएस २०२५ च्या पलीकडे विद्यमान शाश्वततेला पाठिंबा देण्याचा पाया रचला. त्यानंतर, डॉ. केडिया यांनी माहिती दिली की, पुढील वर्षी वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट (डब्ल्यूएसडीएस)चे रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले जाईल, जेथे टीईआरआय कटिबद्धता, सहयोग आणि हवामान कृतीची पंचवीस वर्ष साजरे करण्याची तयारी करत आहे.