आंतरराष्ट्रीय महिला दिनी पर्यावरण मंत्र्यांकडून महिला वनाधिकांऱ्यांवरील ई-पुस्तकाचे विमोचन
महिला अधिकारी आणि कर्मचारी कौशल्यासोबतच करुणा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेने सेवा बजावतात : प्रकाश जावडेकर
या वेळी जावडेकर यांनी व्हर्च्युअल कार्यक्रमात “ग्रीन क्वीन्स ऑफ इंडिया : अ नेशन्स प्राईड“ या ई-पुस्तकाचे विमोचन केले. महिला व अन्य महिला कर्मचाऱ्यांच्या केस स्टडीज त्यांचे अनुभव आणि उत्कृष्ट कार्य याबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या गोष्टींचे हे संकलन असून याला सर्वसामान्य सर्जक मूल्य आहे.
हे ई-पुस्तक वनसेवेतील तरुण महिला कर्मचाऱ्यांना तसेच जंगलात वनाधिकारी म्हणून वास्तव्य करण्याची आणि काम करण्याची इच्छा असणाऱ्या देशभरातील सर्व तरुण स्त्रियांसाठी प्रोत्साहनपर असे ठरेल अशी खात्री जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केली