कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड जवळ प्रदूषण पातळी दर्शविणारे डिजिटल” फलक लावा : विक्रोळी जनता दलाची मागणी
मुंबई : दुर्गंधीचा त्रास होत असल्याने पूर्व द्रुतगती मार्ग कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड जवळ “प्रदूषण पातळी दर्शविणारा डिजिटल” फलक लावावा, अशी मागणी जनता दल विक्रोळी तालुकाने केली आहे. या बाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई येथे पत्र व्यवहार करू असे जनता दलाचे तालुका अध्यक्ष यतीन तोंडवळकर, प्रभाग अध्यक्ष भूषण भिसे, विवेक कांबळे, मुंबई सरचिटणीस ऍड. प्रशांत गायकवाड, जनता दल मुंबई सहकार सेल उपाध्यक्ष नितीन अडकर यांनी सांगितले.
कांजूरमार्ग येथे पूर्व द्रुतगती महामार्गालगत मुंबई महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरून जाताना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येते. असह्य वाटते. तसेच कांजूरमार्ग पूर्व, विक्रोळी कन्नमवारनगर, टागोर नगर विभागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो, असे तोंडवळकर यांनी सांगितले.
सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याने “प्रदूषण पातळी दर्शविणारे डिजिटल” फलक कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंड” जेथे सुरू होते, त्या ठिकाणी लावावा. जेणे करून दिवस आणि रात्रीची प्रदूषणाची पातळी किती आहे, हे समजेल. आणि त्या द्वारे प्रदूषण असल्यास त्यावर कार्यवाही होईल, म्हणून सदर मागणी आम्ही करत आहोत, असे तोंडवळकर, भिसे यांनी सांगितले.