ठाणे जिल्ह्यातून ग्रामपंचायत किसळ सरपंच डॉ कविता वरे यांना संसदभवनाचे निमंत्रण
‘पंचायत से पार्लमेंट’ या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती दौपदि मुर्मु करणार मार्गदर्शन
ठाणे : राष्ट्रीय महिला आयोगांतर्गत दि.६ जानेवारी २०२५ रोजी पंचायत से पार्लमेंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्र राज्याची प्रशिक्षणाच्या क्षेत्रातील शिखर संस्था यशवंतराव चव्हाण प्रशासन व विकास प्रबोधिनी, यशदा, पुणे यांचे कडून प्राप्त मार्गदर्शक सुचनांनुसार जि.प. ठाणे ग्रामपंचायत विभागातून ठाणे जिल्ह्यात अनु. जमातीतील ग्रामपंचायत स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सरपंच यांतून ग्रामपंचायत कारभारात सुसूत्रता, नियोजनबध्द कामकाजाची नोंद व प्रभावी ग्रामप्रशासन चालवणार्या डॉ. कविता वरे, ग्रा.पं. किसळ ता. मुरबाड जि. ठाणे यांची निवड या कार्यक्रमासाठी करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाला राष्ट्रपती महोदय उपस्थित सरपंचांना मार्गदर्शन करणार आहेत.