रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील किंजळकर वाडी येथे एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. काल रविवारी सकाळी हा बिबट्या मृतावस्थेत आढळला. उपासमारीमुळे मृत झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. बिबट्या मादी असून उंची 46 सेंटीमीटर असून लांबी 155 सेंटीमीटर आहे. अंदाजे वय 2 वर्ष आहे. ज्या ठिकाणी मृतावस्थेत सापडला त्या ठिकाणी गवत मळलेलं होतं. भक्षाच्या शोधत तो आला होता आणि मृत झाला असावा असा अंदाज वनविभागाने काढला आहे. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड, वनापाल सुरेश उपरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला.