आरेच्या बचावासाठी विद्यार्थीही सरसावले; कांदिवलीत निदर्शने करत दिल्या सेव्ह आरेच्या घोषणा
मुंबई, (निसार अली) : आरेच्या जंगलात मेट्रोच्या प्रस्तावित कारशेडसाठी 27OO वृक्षांची होणारी तोड
होणार आहे. या विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे. सातत्याने राज्य सरकार आणि मुंबई पालिका, मेट्रो प्रशासनाविरोधात निदर्शने केली जात आहेत. आज विद्यार्थीही रस्त्यावर उतरले आणि सेव्ह आरेच्या घोषणा घोषणा देण्यात आल्या. सकाळी कांदिवली एज्युकेशन सोसायटीच्या श्रॉफ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कांदिवली रेल्वे स्थानक पश्चिम येथे तीव्र निदर्शने केली. सामान्य नागरिकही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते.आरे बचावच्या मोहिमेला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे.
आरेचे जंगल आम्हाला हवे आहे. वायू प्रदूषणाने मुंबईचा श्वास आधीच कोंडला गेला आहे. आरे हे मुंबईचे फुफ्फुस आहे. ते नष्ट करू नका. आमच्या आणि पुढील पिढीला याचे परिणाम भोगावे लागतील, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.