रत्नागिरी जिल्ह्यात वीज पडून 3 जण जखमी तर; विजेचा धक्का बसून 4 जणांना दुखापत
रत्नागिरी दि. 01 : जिल्ह्यात 24 तासात सरासरी 6.69 मिमी तर एकूण 60.20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड 00.00 मिमी , दापोली 00.00 मिमी, खेड 22.80 मिमी, गुहागर 00.30 मिमी, चिपळूण 23.50 मिमी, संगमेश्वर 05.50 मिमी, रत्नागिरी 01.80 मिमी, राजापूर 03.20 मिमी,लांजा 03.10 मिमी.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून 01 जुन 2021 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
दापोली तालुक्यात मौजे नानटे येथील 30 मे 2021 रोजी 03 व्यक्तीला वीजेचा झटका लागून किरकोळ जखमी. जखमीना उपचार करिता जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणतीही जिवीत हानी नाही.
चिपळूण तालुक्यात मौजे पेंढांबे येथील मनिषा अनंत कदम यांच्या घरावर वीज पडून साक्षी अनंत कदम, वय वर्षे १५, सावरी सुभाष गमरे वय वर्षे १५, विजय काशिनाथ गमरे वय वर्षे ३० हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता जवळीत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणतीही जिवीत हानी नाही.
संगमेश्वर तालुक्यातील मौजे वाशी तर्फे देवरुख येथील 30 मे 2021 रोजी दिपक आत्माराम शिंदे यांना वीजेचा झटका लागून किरकोळ जखमी.
मौजे डिंगणी येथे वीज पडल्याने पीठाच्या गिरणीची मोटार व इतर सहित्य जळून खाक झाले. अंशत: १० हजाराचे नुकसान. कोणतीही जिवीत नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी कळविले आहे