मुंबईचे मीठ : खुले आणि झाकलेले
मुंबई आपल्याला रोजगार देतेच देते, कधी उपाशी ठेवत नाही. पण तिची अजून एक ओळख म्हणजे तीच्या जमिनीतून मीठ उगवते. या मिठाला जागूनच आपण मुंबईशी कायम इमान राखून तिचे पर्यावरण रक्षण केलेच पाहिजे.
^^^^^^^^^^
मुंबईत अजूनही मिठाची शेती केली जात आहे. विकासाच्या अतिप्रचंड वेगात ती नष्ट होतेय की काय अशी भीती आहे. पूर्व द्रुतगती मार्गाजवळ विक्रोळी-कांजूरमार्ग-भांडुप-मु
मुलुंडकडून भांडुपच्या दिशेने येत असताना लहानपणापासून दररोज मीठ पाहत आलो आहे. खारफुटीची झाडे, खाडी, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि मीठ असे निसर्गसौंदर्य पूर्वद्रुतगती महामार्गावर नेहमीच अनुभवत आलो आहे. काही वर्षांपासून आलेल्या कांजूरमार्ग डंपिंग ग्राउंडमुळे या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे.
आमच्या लहानपणी विक्रोळी-कांजूरमार्ग येथील मिठागरात गेल्यावर तेथे कन्नमवार नगरातील मुलांना मारहाण होते, असे ऐकायचो. त्यामूळे कधीही जाणे झाले नाही. काही दिवसांपूर्वी कित्येक वर्षांनी मात्र मुलुंडजवळील मीठ शेतीच्या ठिकाणी वळलो. बंद गेट, गेटच्या बाजूने छोट्याशा रस्त्याने आत गेलो. दोन कामगार चर्चा करत उभे होते. एकाला विचारले. मग त्याने मीठशेतीबाबत माहिती द्यायला सुरुवात केली. आजच मीठ गवताने झाकून ठेवले. खाडीच्या पाण्यात (वाफे)भाग पाडले गेले आहेत. पावसानंतर मीठ यायला सुरुवात होईल. पूर्वी खारेपणा जास्त होता. मीठ लवकर जमायचे. आम्ही मीठ नांगरतो. त्याने नांगरही दाखवला. काळे मासे या पाण्यात आढळतात, असे त्याने सांगितले.
बाजूलाच झोपड्या होत्या. हे कामगार स्थलांतरीत होते. उद्या स्थलांतर करतील, मीठ शेतीसाठी ते येथे येतात असेही तो कामगार म्हणाला. त्याकडून फोटो काढण्याची परवानगी घेऊन ते काढले आणि प्रदूषणापासून थोडे लांब आणि गावी आल्याचा अनुभव घेत परतीच्या वाटेला लागलो.
आपण इतक्या जवळ राहूनही येथे का आलो नाही, याची खंत मात्र लागून राहिली.
– प्रशांत गायकवाड