आपले पर्यावरण - आपले भविष्य

तिलारी संवर्धन राखीव क्षेत्र घोषित; अधिसूचना निर्गमित, राज्याची संपन्न जैवविविधता जपण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई, 23 जून : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी वन विभागातील दोडामार्ग वनपरिक्षेत्रात  29.53  चौ.किमी क्षेत्राला तिलारी संवर्धन राखीव म्हणून घोषित करणारी अधिसूचना महसूल आणि वन विभागाने प्रसिद्ध केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारीमध्ये सिंधुदुर्ग...

स्वच्छ पर्यावरणासाठी मध्य रेल्वेचे “स्वच्छता रथ” कार्यरत; ट्रॅकवरून १२ महिन्यांत ९५,००० घनमीटर कचरा जमा

मुंबई, 23 जून :  रेल्वे स्थानक आणि त्यांच्या आसपासच नाही तर रेल्वे रुळांवरही स्वच्छता  राखण्यासाठी रेल्वेने सातत्याने विविध उपाययोजना केल्या आहेत.   मध्य रेल्वेचे मुंबई उपनगरी रेल्वेचे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कपैकी एक...

मुलुंडमध्ये आढळला दुर्मिळ साप तर भांडुपमध्ये माशांच्या टोपलीमध्ये होता समुद्रसर्प

मुंबई : मुलुंडमध्ये एका घरात दुर्मिळ साप आढळून आला तर भांडुपमध्ये माशांच्या टोपलीत समुद्री साप सापडला. सापांबाबत माहिती मिळताच पॉज-मुंबई एसीएफच्या स्वयंसेवकांनी त्यांची सुटका केली. सापांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. मुलुंड पश्चिम मलबार हिल...

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील वन्यजीव कॉरिडॉरचे संरक्षण करावे : आदित्य ठाकरे; प्रकल्पाजवळील खाण साईटच्या प्रस्तावित लिलावास केला विरोध

मुंबई, 22 June : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साईटच्या प्रस्तावित  लिलावाच्या मुद्यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री  प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून प्रस्तावित लिलावाला विरोध केला आहे. आपल्या वन्यजीव कॉरिडॉरचा आपण असा नाश करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे....

सूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक : अंनिस

मुंबई. 21 June : आज जे सूर्यग्रहण आहेत ती खगोलशास्त्रीय घटना आहे. त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता घरातून बाहेर पडले पाहीजे. सूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक आहेत. पृथ्वीच्या मध्ये आज चंद्र आला आहे. त्यामुळे...

आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्था करणार आगामी सूर्यग्रहणाचे समाज माध्यमांवर थेट प्रसारण

नवी दिल्ली, 19 जून :  या वर्षातील पहिले सूर्यग्रहण 21 जून 2020 रोजी सकाळी 10:25 पासून भारताच्या उत्तरेकडील भागातून पाहता येईल. या संदर्भात, नैनितालच्या आर्यभट्ट खगोलशास्त्र संशोधन संस्थेने (एआरआयईएस), तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) या सरकारच्या स्वायत्त संस्थेने 19 जून 2020 रोजी दुपारी 03:30 वाजता आर्यभट्ट संशोधन...

महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून २५०० मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प : ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

राज्याची भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रकल्प मुंबई, 18 जून : राज्याच्या भविष्यातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी महानिर्मिती आणि एनटीपीसी यांच्या संयुक्त प्रयत्नातून 2500 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या...

21 जून 2020 रोजी दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण

नवी दिल्ली : 21 जून 2020 रोजी (31 ज्येष्ठ, 1942 शक संवत) कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. भारताच्या उत्तर भागात काही ठिकाणी (राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंड मध्ये काही भागात) सकाळी कंकणाकृती ग्रहण दिसेल तर देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येईल....

पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन आढळला

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी मृत डॉल्फिन मासा आढळला. वनविभागाला याची माहिती मिळताच माशाची रविवारी विल्हेवाट लावण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी पाळंदे समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. समुद्रकिनार्‍यावर मोठा खड्डा खणण्यात आला आणि  माशाची विल्हेवाट लावली. डॉल्फिनचे वजन...

‘अर्थ डे’निमित्त होणा-या ऑनलाइन कॉन्सर्टमध्ये ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांचा सहभाग

मुंबई : जागतिक अर्थ डेनिमित्त मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिकांसाठीची सोशल आणि प्रोफेशनल नेटवर्किंग साइट असलेल्या वनपेज स्पॉटलाइटने २२ एप्रिल रोजी ६० मिनिटांची ऑनलाइन कॉन्सर्ट आयोजित केली आहे. यात ५ ग्रॅमी पुरस्कार विजेत्यांसह ६ देशांतील ४० संगीतकारांचा...