वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन,सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली, 04 मार्च 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जामनगर इथे वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन, सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे उद्घाटन केले.अनंत अंबानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची या करुणापूर्ण प्रयत्नांबद्दल प्रशंसा करुन ते म्हणाले की,वनतारा प्राण्यांसाठी सुरक्षित आसऱ्याचे ठिकाण आहे. पर्यावरणाची शाश्वतता व वन्यजीवांच्या कल्याणालाही इथे प्रोत्साहन दिले जात आहे.
X या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे :
“वनतारा या अनोख्या वन्यजीव संवर्धन, सुटका व पुनर्वसन उपक्रमाचे उद्घाटन केले; जिथे प्राण्यांसाठी सुरक्षित आसऱ्यासह पर्यावरण शाश्वतता व वन्यजीव कल्याणालाही प्रोत्साहन दिले जात आहे. या खूपच ममतापूर्ण कामासाठी मी अनंत अंबानी व त्यांच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाची प्रशंसा करतो.”
“वनतारासारखा उपक्रम खरोखरच प्रशंसनीय आहे. पृथ्वीवरच्या आपल्यासोबत राहणाऱ्या सर्व जीवमात्रांचे संरक्षण करण्याच्या आपल्या शेकडो वर्षांपासूनच्या परंपरेचेच हे उत्साहवर्धक उदाहरण आहे.