राण्यांच्या वस्तीच झाड : प्रा. भूषण भोईर
*आमच्या पालघरच्या वाघोबा घाटात एका झाडावर तब्बल २५ ते ३० मधमाश्यांचे पोळे लागले आहेत. हे झाड रस्त्याच्या अगदीच कडेला आहे. आणि त्याची उंच डेरेदार काया आणि त्यावर लगडलेले आग्या मधमाशी चे पोळे अगदी सहजच त्याला इतर सर्व वृक्षांमध्ये राजबिंडा बनवतात.*
*गेली कित्तेक वर्ष मी ह्या घाटातून ये जा करत आहे. काही वर्ष पूर्वी ह्या झाडावर अगदीच एक किव्वा दोनच पोळं लागलेली असायची पण अगदी अलीकडेच इथे फार मोठ्या प्रमाणात एकच झाडावर मधमाश्या नी वस्ती का बर केली असावी???*
*कदाचित एकटं पोळं लागलेलं असताना ते सहज काढून नेता येत होत. ह्या झाडावरून अश्या प्रकारे पोळी उतरवताना मी काही आदिवासींना पाहिलं देखील होत. परंतु, अलीकडेच ह्या मधमाश्यानी एकीच बळ जाणल असावं. आणि एकटं पोळं माणूस कधीपण काढून नेतो हे ओलखल असावं त्या मुळे तर ह्या एकत्र राहत नसतील ना???*
*अश्या प्रकारचा बदल घडवून आणत असताना त्यांना अपसी समझोता देखील नक्कीच करावा लागला असावा. कारण एवढ्या मोठ्या माश्या एकाच वेळी जेव्हा मध गोळा करण्यासाठी जात असतील तेव्हा फुलं, आणि मकरंद यांच्या साठी त्यांच्यात नक्कीच स्पर्धा होत असणार. मग ही स्पर्धा टाळता यावी ह्या साठी त्यांनी आपसी समझोता करून घेतला आहे का??? की अमुक एक क्षेत्र ह्या राणीच्या पोळ्याच तमुक एक हद्द दुसऱ्या राणीची, अमुक मधमाश्या फक्त तमुक एक दिशेलाच उडतात आणि तमुक एक विरुद्ध दिशेला. ह्यावर अभ्यास करणे गरजेचं आहे. तसेच, पालघर पट्ट्यात शहरीकरण वाढल्या मुळे वाघोबा परिसरातील लोकांनी शेती बंद केली, कमी केली ज्या मुळे शेतीत होणाऱ्या कीटक नाशकांचा वापर कमी झाला असावा, ज्या मुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मधमाश्यांची वस्ती वाढली असावी असा माझा प्रार्थमिक अंदाज आहे. तसेच, आग्या मधमाशी फार लांबचे अंतर कापून मध गोळा करत असावी असं देखील मला वाटतं. त्या मुळेच एवढ्या साऱ्या राण्या एकाच झाडावर न भांडता वस्ती करत आहेत.*
*ह्या पोळ्यांच्यात नर आदला बदली तर होत नाही ना??? कारण, मधमाशीच्या प्रजनन प्रक्रियेचा अंदाज घेतला तर असे समजते की रानी माशी तिच्या आयुष्यात फक्त एकदाच मिलन करते आणि त्या वेळी ती असंख्य नरांच्या सोबत मिलन करून त्यांचे शुक्राणू शरीरात तिची जीवन शक्ती संपत येई पर्यंत साठवून ठेवते. आणि उर्वरित आयुष्यात ती तिच्याजवळ असलेल्या शुक्राणूंचावापर करून निषेचीत (fertilised eggs) अंडी देते. आता पुढे ह्या निशेचीत अंड्यातून बाहेर येणाऱ्या सर्व माश्या मादी म्हणून जन्माला येतात. त्यांची वाढ होत असताना त्यांना काय खायला मिळते ह्यावर त्या राणी होणार की दासी ह्यावर अवलंबून असते. जर ह्या पोळ्यातील प्रतेक निषेचित अंड्यातून बाहेर येणाऱ्या मादीला राणी माशी ने तयार केलेलं मध (रॉयल जेली) दिली तर प्रतेक मादी राणी म्हणून जन्माला येऊ शकते. आणि त्यांना जर दासी ने बनवलेलं मध दिलं तर त्या दासी बनतात.*
*आता राहिला प्रश्न नारांचा तर, ज्या वेळी पोळ्यातिल राणी माशी म्हातारी होते आणि तिच्या जवळील शुक्राणूंचासाठा संपतो त्या वेळी ती कोरडी अंडी(unfertilized eggs) घालू लागते आणि अश्या अंड्यातून नरांचा जन्म होतो. आणि नेमका ह्याच वेळी त्या पोळ्यात दासी माश्या नवीन राणी माशी साठी मोठ्या आकाराची पेशी/कक्ष (wart) तयार करतात आणि मग नवीन राणी माशी त्याच पोळ्यात तयार झालेल्या नराना आणि काही कष्टकरी माश्यांना घेऊन नारांच्या सोबत मिलन करते आणि मग नवीन सुरक्षित जागा निवडून तिथे पोळा बनवण्याचे आदेश देते. नारांसोबत मिलन झाल्या नंतर त्यांचं काम संपल की सर्व दासी माश्या मिळून सर्व नारांची हत्या करतात हे विशेश.*
*आता मला प्रश्न पडला आहे तो हा की जर माश्या लाखो वर्ष फक्त एकच राणी माशी च्या पोळ्यात तयार झालेल्या नरांसोबत मिलन करत आल्या असतील तर त्यांच्यात जनुकीय बदल घडणार कसे??? त्यांना “ह्याब्रिड विगर” म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर आंतर जातीय विवाह करून जनुके अद्यावत करता येत नसतील आणि असे असेल तर ह्या मधमाश्या एवढी लाखो वर्ष कश्या काय तग धरून आहेत??? म्हणून कदाचित अश्या प्रकारे जवळ जवळ वस्त्या करून त्या नरांची अदला बदल करून त्यांची जनुकीय संरचना अद्यावत करत असतील अशी शंका येते. प्रश्न असंख्य आहेत. आणि उत्तरे शोधावी लागतील. त्या साठी निसर्गात पुन्हा पुन्हा जाऊन निरीक्षण करत बसावं लागेल. तोवर जागतिक मधमाशी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*
प्रा. भूषण विलास भोईर,
सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग,
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,
८२३७१५०५२३