रत्नागिरी, प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई ही गंभीर समस्या असून आजपासून रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाय योजनाच्या माध्यमातून सोडवीण्याची गरज आहे,यासाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घेणेची गरज आहे असे प्रतिपादन जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन यांनी केले.ते पुढे म्हणाले की,अनुलोमच्या माध्यमातून पाण्यासाठी चळवळ उभी राहण्यासाठी सर्व् प्रकारचे सहकार्य केले जाईल,यासाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची गरज आहे.अनुलोम व रत्नागिरी नगर जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने रेन वॉटर हार्वेस्टिंग-काळाची गरज जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील,वॉटर फील्ड टेक्नॉलॉजी प्रमुख संदीप अध्यापक, अनुलोम चे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपविभाग प्रमुख स्वप्नील सावंत, रत्नागिरी भाग जनसेवक रविंद्र भोवड उपस्थित होते.
अनुलोमच्या सहकार्याने महाराष्ट्र मध्ये सुरू असलेले पाणी विषयातले काम हे प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीपूजन व दीप प्रज्वलन करून झाली,त्यानंतर अनुलोमचे उपविभागप्रमुख स्वप्नील सावंत यांनी प्रास्तविक मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की,अनुलोमच्या माध्यमातून विविध उपक्रमाची जनजागृती करण्यात येते व लोकसहभागातून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते,रेन वॉटर हार्वेस्टिंग ही लोकसहभागातून चळवळ उभी रहाणे गरजेचे आहे, त्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यावेळी संदीप अध्यापक यांनी पाण्याचे महत्व,समुद्रातील खारे पाणी व त्याचे गोड्या पाण्यात रूपांतर, पाणी विक्री करणारे भविष्यातील मक्तेदार,रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याच्या पद्धती याबद्दल सखोल माहिती उपस्थितांना दिली.
उपस्थीत मान्यवरांचे स्वागत भाग जनसेवक रवींद्र भोवड व सूत्रसंचालन नगर वाचनालयांच्या सदस्य सौ.पूजा कात्रे मॅडम यांनी केले.