रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : रत्नागिरीत दुर्मिळ साप आढळून आला आहे. झीलन असं या सापाचं नाव आहे. निमविषारी या प्रकारात हा साप मोडतो. प्रामुख्याने हा साप खाडी पट्ट्यात आढळतो. प्रवीण कदम या सर्पमित्राने हा साप रत्नागिरीतील पाटीलवाडी परिसरात पकडला. सापांना पकडून त्यांना जीवनदान दिलं जातं. झीलन ला देखील सुरक्षित जंगलात सोडण्यात आलं आहे. झीलन हा निमविषारी असला तरी त्याच्या दंशाने माणूस मरु शकत नाही असा दावा सर्पमित्राने केला आहे.