युवक – युवतींने मानवी साखळी करीत पुन्हा आरे मध्ये ,कारशेड आणल्यास “आम्ही रोखू” प्राणपणाने लढू, असा इशाराच राज्य शासनाला दिला आहे.सदर निदर्शने व मानवी साखळी लोकशाही व सनदशीर मार्गाने करण्यात आली.
DYFI चा विकासाला किंवा मेट्रोला विरोध नसून,लाखो झाडांच्या कत्तली करून आरे जंगल परिसराचे सिमेंटीकरण करण्याला विरोध आहे.या जंगलात आजही वन्य जीव व आदीवासी नैसर्गिक पर्यावरणात राहत आहेत.आरेचे जंगल हे मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाते.याच जंगलात ३ नद्यांचे उगमस्थान आहे.काही दिवसांपूर्वीच येथे बिबट्याचा बछडा आढळला आहे.पर्यावरणाचा -हास करून होणारा अमानवी विकास आम्हाला नको असे स्थानिकांचे व संघटनेचे म्हणणे आहे.
DYFI ने गेल्या वेळेसपण शेकडो युवक-युवतींना “सेव्ह आरे” मोहीमेत जोडले होते.आता देखील संघटना स्थानिक आदीवासी नागरिक यांच्या खांद्याला खांदा लावून लोकशाही पद्धतीने आरे वाचविण्याचे आंदोलन पुढे नेईल, अशी माहितीप्रविण भास्कर मांजलकर,महाराष्ट्र राज्य कमिटी सदस्य,DYFI यांनी दिली.