मुंबई. 21 June : आज जे सूर्यग्रहण आहेत ती खगोलशास्त्रीय घटना आहे. त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता घरातून बाहेर पडले पाहीजे. सूर्यग्रहणाच्या वेळी पाळल्या जाणाऱ्या अंधश्रद्धा अवैज्ञानिक आहेत. पृथ्वीच्या मध्ये आज चंद्र आला आहे. त्यामुळे त्यांनी सूर्याची किरणे अडवली असून एवढी साधी घटना आहे. ग्रहणाचे वेगेवेगळे प्रकार असतात असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नंदकिशोर तळाशीकर यांनी सांगितले.
मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि लॉकडाऊनमुळे बहुतांश ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्याची संधी अनेकांना मिळाली नाही. प्रभादेवी येथे बच्चेकंपनीने तळाशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रहणामागेचे वैज्ञानिक कारण शारीरिक अंतर ठेवत जाणून घेतले.
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे बहुतांश ठिकाणी सूर्यग्रहण पाहण्याची संधी अनेकांना मिळाली नाही. मात्र सकाळी 11 च्या सुमारास काही ठिकाणी आकाशात दाटलेले ढग काही काळासाठी बाजूला झाले आणि अनेकांना सूर्यग्रहण पाहायला मिळाले. विशेष चष्मे वापरून प्रभादेवी येथील प्रभा-विनायक सोसायटीच्या गच्चीवर बच्चेकंपनीने ग्रहण पाहण्याचा आनंद लुटला.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती सूर्यग्रहणाबाबत असलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी मोहिम राज्यभर राबवत आहे. ग्रहण पाहिल्याने अनिष्ठ घडते, गरोदर महिलांवर दुष्परिणाम होतात त्यामुळे ग्रहणात भरून ठेवलेले पाणी देखील सांडून दिले जाते. असे अनेक समज गैरसमज आहेत. ते दूर करुन वैज्ञानिक दृष्टीकोनातून ग्रहणाचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे अंनिसचे नंदकिशोर तळाशीकर यांनी यावेळी केला.