पर्यावरणपूरक आणि सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्यासाठी महिंद्र समुहाने दिल्या टिप्स
दिवाळी हा सण केवळदिव्यांच्या आराशीपुरतामर्यादीत नसतो, तर हाआनंदाचा, मौजमजेचा, उत्साहाचाही सण असतो. आपल्या परंपरेनुसार, दिवाळीत कुटुंबिय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन उत्सव विविध प्रकारे साजरा करतातआणिआपली नात्यांची वीण घट्ट करतात. मात्र सण उत्साहात साजरा करून झाल्यानंतर त्याचा आपल्या शरीरावर वाईटपरिणाम होतो का? घशातील खवखव, डोळ्यांची आग आणि धुराने काळवंडलेले वातावरण यांनी आपल्या आनंदावरविरजणपडले नाही ना? महिंद्र समूह आपल्याला टीपा देत आहे.. दिवाळी पर्यावरणपूरक पध्दतीने साजरी कशी करावीयाबद्दल..
– घरात रोषणाई करण्यासाठी एलइडीचे दिवे वापरा. विशेषतः घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी तेलाचे दिवे धोकादायक ठरू शकतात. एलईडी दिवे सुरक्षित व वीजबचत करणारे असतात.
– आकाशकंदिल बनविण्यात घरातील सर्वांना सहभागी करून घ्या. त्यामुळे तुमच्यातील नातेसंबंध वाढतीलच, त्याशिवाय कुटुंबियांच्या सृजनशीलतेला वाव मिळेल.
– हाताने बनविलेल्या वा स्थानिक बाजारात मिळणाऱ्या वस्तू भेट म्हणून द्या. ऑनलाईन पध्दतीने मागवलेल्या वस्तूंमुळे कार्बनचे उत्सर्जन जास्त होत असते.
– मित्र, कुटुंबिय, हाताखालील कर्मचारी, ग्राहक, पक्षकार, सहकारी यांना झाडांची रोपे भेट द्या. त्यामुळे या भूतलावरील हिरवाई वाढण्यास मदत होईल आणि आपल्याला ते खिशालाही परवडेल.
– फराळाचे पदार्थ व मिठाई घरीच बनवा – ते आरोग्यदायी असते आणि स्वस्तही पडते. बाहेरून घ्यायचेच झाल्यास स्थानिक बाजारातून खाद्यपदार्थ खरेदी करा.
– घर सजविण्यासाठी तोरण बांधताना वा रांगोळीमध्ये स्थानिक बाजारात मिळणारी फुले-पाने वापरा.
– कापडाच्या वा तागाच्या पिशव्यांचा वापर करण्यास इतरांना प्रोत्साहन द्या अथवा त्यांना या पिशव्या भेट द्या.
– प्लास्टिक वापरणे टाळा. भेटवस्तू व खाद्यपदार्थ यांचे पॅकेजिंग करताना हातकागदाचा उपयोग करा.
– मोठा आवाज करणारे, धूर सोडणारे फटाके उडवणे टाळा. मुळात फटाके उडवूच नका आणि प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा. फटाक्यांमुळे आवाजाचे व हवेचे प्रदूषण होते. दिवाळीतील फावला वेळ आपल्या कुटुंबियांसोबत व मित्रांसोबत घालवा, बैठे खेळ खेळा.
– घरातील क्रॉकरी व कटलरी या वस्तू विघटीत घटकांपासून तयार केलेल्या असतील असे पाहा. त्यामुळे घरातील गृहिणींना व मोलकरणींना कमी काम करावे लागेल. या विघटीत कटलरीची विल्हेवाट लावतानादेखील ती विघटीत होणाऱ्या पिशवीत टाका व जबाबदारीने काम करा.
– सण साजरा झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी आपली सर्वांचीच आहे. त्यातील विघटीत होणारा व न होणारा कचरा वेगवेगळा काढून त्यांची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.
– सर्वात शेवटी महत्वाचे, उत्सव संपल्यानंतर आपल्या घरात व परिसरात कोठेही कचरा राहणार नाही, याची काळजी घ्या. आनंदाच्या दिवसांमध्ये आजूबाजूला कचरा दिसत राहणे, हे योग्य नाही.