’युनायटेड वे’ मुंबईचे मिशन मॅनग्रूव्हज; जागतिक खारफुटी दिनानिमित्त नेरूळमधील करावे येथे खारफुटींचे वृक्षारोपण
नवी मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण करणार्या खारफुटीच्या झाडांमध्ये वाढ व्हावी, या उद्देशाने युनायटेड वे, मुंबई या संस्थेने मिशन मॆग्रुव्हज नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. त्यानुसार कांदळवने वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. २६ जुलै ला जागतिक कांदळवन दिन पाळला जातो. या निमित्त युनायटेड वे, मुंबई ने टाटा टेक्नोलॊजी च्या कर्मचार्यांच्या सहाय्याने नेरुळ मधील करावे गाव येथे खारफुटींचे वॄक्षारोपण केले. टाटा टेक्नोलॊजीचे २३ कर्मचारी यावेळी सहभागी झाले होते. पर्यावरणाचे रक्षण होणे महत्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कृतीशील कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे, असे या कर्मचार्यांनी सांगितले. युनायटेड वे, मुंबई आणि मुंबई कांदळ वन कक्षाच्या वतीने खारफुटींचे वृक्षारोपण झाले.
खारफुटीचा झालेला र्हास आपण भरून काढून शकत नाही. आम्ही या प्रकल्पाद्वारे त्याच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती युनायटेड वे ऒफ इंडिया मुंबईचे कार्यक्रम संचालक अजय गोवले यांनी दिली.