लवकरच कळणार मुंबई महानगर प्रदेश किनारपट्टीतील डॉल्फिनची संख्या!
संकटग्रस्त प्रजातीच्या दीर्घकालीन संरक्षणासाठी अभ्यास उपयुक्त
दक्षिण मुंबईतील बॅकबे परिसरात नुकत्याच झालेल्या एका पथदर्शी अभ्यासात इंडियन ओशन हम्पबॅकचे २७ वेळा दर्शन झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशातील १५० कि.मी च्या किनारपट्टीतील डॉल्फिनची संख्या किती, त्यांच्या अधिवासाचा वावर याचा सविस्तर अभ्यास राज्याच्या कांदळवन कक्षामार्फत हाती घेण्यात येणार आहे. एखाद्या विशिष्ट भागासाठी होणारा अभ्यास हा केवळ डॉल्फिनच्या वर्तनाची चांगली झलक मिळण्यापुरता मर्यादित नाही तर मुंबई महानगर प्रदेशासारख्या ठिकाणी विज्ञानाधारित संवर्धनाचे प्रारुप तयार करण्यास हा अभ्यास उपयोगी पडेल तसेच यामुळे संकटग्रस्त असलेल्या या प्रजातीचे दीर्घकालीन संरक्षण करण्यास मदत होईल
महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० कि.मी लांबीच्या किनारपट्टीवर समृद्ध जैवविविधता असून अशा प्रकारच्या अभ्यासामुळे या जैवविविधतेच्या जपणूकीला चालना मिळेल, असा विश्वास ही या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे
कोस्टल कन्झर्वेशन फाऊंडेशनने (सी.सी.एफ) १४ एप्रिल ते ११ मे २०२२ या कालावधी दरम्यान हाजी अली खाडी, राजभवन आणि बॅकबे भागात यासंबंधीचा प्राथमिक अभ्यास केला होता. यावेळी त्यांना २७ वेळा डॉल्फिन सामोरे आले. त्यामुळे या भागात डॉल्फिनचा वावर आणि अधिवास याबाबत निश्चिती झाली आहे. यामध्ये सहा डॉल्फिनचा एक मोठा समूह आढळून आला तर एकांडा डॉल्फिनही आढळून आले. १५ वेळा समूह डॉल्फिनची दृष्ये दिसल्याचे या प्राथमिक अभ्यासा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील, आरेतील बिबटे असोत, कांदळवन पट्टयातील कोल्हे किंवा किनारपट्टीत दिसून येणारे डॉल्फिन आणि कासवे असोत मुंबई महानगरासारख्या गजबजाटाच्या ठिकाणी वन्यजीवांची ही भरभराट मुंबईकरांसाठी भाग्याची गोष्ट आहे. वातावरण बदलाच्या अस्थिर काळात या सागरी सस्तन प्राण्यांबाबतच्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केल्याने किनारपट्टीवरील मच्छिमार, बंदर अधिकारी आणि पर्यटन व्यावसायिक या सर्व घटकांमध्ये या विषयाचे महत्व अधारेखित होईल तसेच यामुळे पर्यटनाला चालना देणारी महत्वाची ठिकाणी ही ठरविता येतील. त्या भागाचे संवर्धन करणे शक्य होईल.
*मुंबईभोवतालच्या समुद्रात २ प्रकारच्या डॉल्फिन प्रजाती*
डॉल्फिन ही सिटेशियन वर्गीय संकटग्रस्त प्रजाती असून त्यास भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. मुंबई भोवतालच्या समुद्रात इंडियन हम्प बॅक डॉल्फिन आणि इंडो- पॅसेफिक फिनलेस पॉरपॉईज या दोन सिटेशियन वर्गीय प्रजाती आढळतात अशी माहिती देऊन कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य संरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली आहे. ते म्हणाले की,मनोरी, वर्सोवा खाडी ते नरिमन पॉईंट, मरिन ड्राईव्ह आणि अलिबागच्या दिशेने असणाऱ्या मुंबईच्या किनारपट्टीवर डॉल्फिन विखुरलेल्या स्वरूपात दिसले आहेत. मात्र डॉल्फिनच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी तसेच त्यांच्या अधिवासाच्या वापराच्या विश्लेषणासाठी यापूर्वी समर्पित अभ्यास झालेला नाही. तो आता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यानंतर या अभ्यासाची सुरुवात होईल.
*पथदर्शी अभ्यासाची निरीक्षणे*
पथदर्शी अभ्यासात प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक शौनक मोदी, सिटेशियन पर्यावरण शास्त्रज्ञ माही माणकेश्वर, सागरी पर्यावरणप्रेमी प्रदीप पाताडे यांनी सात वेळा बोटीतून सर्वेक्षण केले जलद मुल्यांकन पद्धतीने केलेल्या या अभ्यासात या परिसरात डॉल्फिनचे वास्तव्य कसे आहे, त्यांच्या अधिवासाचा ते कसा वापर करतात याबाबतची प्राथमिक कल्पना आली आहे. या अभ्यासामुळे पर्यावरणीय आणि या भागातील मानव निर्मित घटकांना डॉल्फिन कसे प्रतिसाद देतात हे समजण्याची संधी मिळाली असल्याचे शौनक मोदी यांनी म्हटले आहे.
समुद्राची स्थिती, खोली, तापमान, क्षारता, गढुळपणा, भरती- ओहोटी अशा पर्यावरणीय स्थिती आणि माहितीचा वापर सीसीएफ टीमने आपल्या प्राथमिक अभ्यासाच्यावेळी केला होता.
बदलत्या वातावरणामुळे इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिनच्या अधिवासावर, त्यांचा भ्रमणमार्ग आणि अन्नसेवनाच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याचे या क्षेत्रातील संशोधकांचे निरीक्षण आहे. हा अभ्यास या परिणामांचा अभ्यास करून योग्य उपाययोजना करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
*जाणून घेऊया इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिनविषयी…*
इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन समूहाने राहातात याची संख्या साधारणत: बारा डॉल्फिनपर्यंत असते असे असले तरी त्यात मोठे बदल देखील दिसतात. सायएनिड मासे, सेफॅलोपोड आणि क्रस्टेशियन हे त्यांचे खाद्य असून इंटरनॅशल युनिअन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर ( IUCN) च्या यादीनुसार त्यांची संकटग्रस्त प्रजाती म्हणून नोंद आहे.
…