लंडनहून अभिषेक परतला पर्यावरणप्रेमी म्हणूनच; विक्रोळीतील रस्त्यांवर चालवतोय ‘ई’ किक सायकल
मुंबई । पट्टीचा दुचाकीस्वार असलेला अभिषेक शिगवण लंडनहून पर्यावरणप्रेमी बनून परतला आहे. बाईक चालवणे कमी करून तो विक्रोळीतील रस्त्यांवर इलेक्ट्रिक किक सायकल फिरवत आहे. विक्रोळी कन्नमवार नगरात त्याची ही सायकल चर्चेचा विषय ठरत आहे. पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यास माझाही हातभार लागावा, यासाठी केलेला प्रयत्न आहे,असे अभिषेक म्हणतो…
एक पाय जमिनीवर, त्या पायाला गती देऊन, हँडल पकडून किक सायकल चालवणारी लहान मुले नेहमी नजरेस पडतात. या किक सायकलचे आधुनिक असणारी इलेक्ट्रीक सायकल अभिषेक शिगवण न लाजता रस्त्यावरून चालवत आहे.
लंडनमध्ये कामानिमित्त अभिषेक राहत होता. तेथील नागरिक ‘ई’ किक सायकल वापरतात आणि पर्यावरणाचे संरक्षण करतात, हे अभिषेकने पाहिले आणि
मायदेशी परतताना त्याने ही सायकल विकत घेतली. दैनंदिन कामासाठी तिचा वापर त्याने सुरू केला आहे.
मुंबईतील प्रचंड वाहतूक कोंडी आहे. प्रदूषण वाढत आहे, याचा विचार अभिषेकने केला. आता तो ‘ई’ किक सायकलला प्राधान्य देत आहे. त्याचे शिक्षण हॉस्पिटीलिटी हॉटेल मॅनेजमेंट मध्ये झाले आहे. लंडनमध्ये छोट्या कामासाठीही तेथील नागरिक छोट्या कामासाठी या सायकलचा वापर करत असल्याचे त्याला दिसले. यामुळे प्रदूषण होत नाही हे त्याला समजले आणि इलेक्ट्रिक किक सायकल घेऊन आला. त्याच्याजवळ बुलेट मोटरसायकल आहे. त्याने ती चालवणे बंद केले आहे. पर्यावरण वाचवा असा संदेश तो आता सायकलद्वारे सर्वांना देऊ लागला आहे.
“मी छोट्या छोट्या कामासाठीही बाईक चालवत होतो. लंडनमध्ये पर्यावरणाचे महत्व समजले. तेव्हाच ठरवले भारतात इलेक्ट्रिक किक सायकल चालवायची. एका चार्जिंगवर 25 ते 30 किमी चालते. फोल्डिंग करता येते. या ‘ई’ वाहनाचा वापर करा, ” असे मी सांगेन, असे अभिषेक म्हणाला.
रस्त्यांची अडचण
फक्त विक्रोळीतील रस्ते सपाट नसल्याने आणि खड्डेही असल्याने ही सायकल चालवायला थोडा त्रास होतो, सायकल पलटूही शकते, अशी खंत त्याने व्यक्त केली.