कचरामुक्त मुंबई अभियानचे उद्घाटन
मुंबई : दर महिन्यातील सर्व शनिवार – रविवार सहित किमान १० दिवस लोकसहभागातून व मुंबई पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेव्दारे संयुक्त ‘ कचरामुक्त मुंबई अभियान’ राबविण्यात येणार आहे. या ‘ कचरामुक्त मुंबई अभियान’चे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दि. २९ जुलै रोजी पोलिस मुख्यालयात पार पडले.
याप्रसंगी गृह राज्यमंत्री दिपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) संजयकुमार, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, पोलिस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक बिपीन बिहारी, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे तसेच पोलिस महासंचालक (सायबर गुन्हे) ब्रिजेश सिंग हे मान्यवर उपस्थित होते.