रत्नागिरी : चिपळूण शहराच्या परकार कॉम्प्लेक्स परिसरात एक मगर नागरी वस्तीच्या भागात घुसली. यमुळे एकच धावपळ उडाली. शहरातून वाहणाऱ्या शिव नदीतून मगर बाहेर येऊन परकार कॉम्प्लेक्स परिसरात आली. यानंतर वन विभाग आणि काही एक्स्पर्टसना बोलावून तिला जेरबंद करण्यात आलं. मगरीला बहादूरशेख नाक्याजवळ वाशिष्टी नदीजवळ मुक्त करण्यात आले. मगर वाशिष्टीच्या पात्रात गेली.
दरम्यान, चिपळूण शहर परिसरातील नदीत मगरींचा वावर आणि संख्या वाढली आहे.