विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार करणारे सेंट मॅथिव्ज हायस्कूल; ३०० हून अधिक रोपांची लागवड
मुंबई, (निसार अली) : शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर पर्यावरण रक्षणाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने मालवणीतील सेंट मॅथिव्ज या शाळेने पर्यावरणस्नेही उपक्रम राबिवले आहेत. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रोपवाटीका तयार केली आहे. सुमारे ३०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारची रोपं शाळेच्या गच्चीवर आणि प्रांगणात लावण्यात आली आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापिका लारझी वर्गीस यांंना एके दिवशी अननसाचा वरचा भाग शेकडोच्या संख्येने फेकलेला दिसला. यानंतर त्यांना रोपवाटीकेची कल्पना सुचली. त्यांनी विद्यार्थ्यांना डब्बे, टाकाऊ भांडी आदी घेऊन येण्यास सांगितले. यानंतर अननस त्यात लावण्यात आले. आज या रोप वाटीकेत 300 हुन अधिक वेग वेगळ्या प्रकारची झाड आहेत. सदाफ़ुली, गुलाब, केळी, कोरफड, आंबा, जांभूळ, तुळस, रताळे आदी रोपांचे संवर्धन येथे करण्यात येत आहे,.
कोरफडीपासून विद्यार्थ्यांनी साबण, नैसर्गिक कीटकनाशक तयार केली अह आहेत.
या शाळेत विध्यार्थ्यांना पाणी वाचवण्यासाठी नुसतं पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्षात उपक्रमाद्वारे माहिती दिली जाते. समुद्रातील प्रदूषण, जलचर, मासे यांचे संरक्षण यांचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येते. फ़ेकलेले बुट, गाडीचे टायर, आंब्याच्या पेट्या, गोण्या, कागद आदी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशा तयार कराव्यात, हे विध्यार्थ्यांनी शिकविले जाते. मदर्स नेचर क्लबची मदतही त्यासाठी घेतली जाते. नैसर्गिक खत निर्मितीही शाळेत केली जाते. आझमीनागर परिसरातील कचरा शाळेत गोळा करून खतनिर्मिती करून तेच खत रोपवाटीकेत वापरले जाते. ठिंबक सिंचन पद्धतीचा उपयोगही केला जातो.