गोदरेज अॅग्रोव्हेटचा सोफिया कॉलेजमध्ये सौरऊर्जा प्रकल्प
मुंबई : गोदरेज अॅग्रोव्हेटने मुंबईतील सोफिया कॉलेज फॉर विमेनच्या छतावर 64.02 किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प नुकताच कार्यान्वित केला आहे. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे सोफिया कॉलेजला 75 टन कार्बनडाय ऑक्साइड इतका ग्रीनहाउस गॅस कमी करतायेणार आहे व दरवर्षी अंदाजे एक लाख युनिट विजेची निर्मिती करता येणार आहे.
भारत हा वीज उत्पादन करणारा व वापरणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. आपण वापरत असलेली बहुतांश ऊर्जा कोळसा, तेल व नैसर्गिक वायू अशा जीवाश्म इंधनांपासून तयार केली जाते. भारतात सध्या केवळ 15% ऊर्जा अपारंपरिक स्रोतांपासून निर्माण केली जाते व त्यातील बहुतेकशी हायड्रोपॉवरपासून तयार होते. जगातील अन्य महत्त्वाच्या देशांच्या तुलनेत, भारतात उर्जेचा वापर झपाट्यानेवाढतो आहे आणि ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक शाश्वत ऊर्जास्रोतांचा अवलंब करणे गरजेचे आहे.
गोदरेज अॅग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक बलराम सिंह यादव म्हणाले, “गोदरेजमध्ये आम्ही सामाजिक जबाबदारीचे उत्तमरित्या पालन करतो. आम्ही ‘हरित भारत’ घडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि हरित भारताच्या दिशेने टाकलेल्या या पावलामुळे सोफिया कॉलेजला विजेचे बिल कमी करण्यासाठी मदत होईलच, शिवाय शैक्षणिक संस्थांना त्यांच्या आजूबाजूला सुरू असलेल्या घडामोडींचीही कल्पना येईल.”
सोफिया कॉलेजचे प्राचार्य डॉ. (वरिष्ठ) आनंदा अमृतलाल यांनी सांगितले, “सोफिया कॉलेजमध्ये सोलार पॅनल बसवण्याचा गोदरेज अॅग्रोव्हेटलि.च्या सीएसआर युनिटचा उपक्रम उल्लेखनीय आहे. पर्यावरणाचे संरक्षण करण्याची बांधिलकी गांभिर्याने जपणाऱ्यांसाठी सौर उर्जेमध्ये वाढ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यामुळे दोन हेतू साध्य होतील: आवार हरित होईल आणि विजेचे बिल कमी झाल्याने महिलांच्यासबलीकरणासाठीच्या प्रयत्नांमध्ये मदत होईल.”
समूहाच्या ‘गुड अँड ग्रीन’ या अधिक समावेशक व अधिक हरित भारताची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट असलेल्या धोरणाच्या अनुषंगाने, गोदरेज अॅग्रोव्हेट आपले कार्य पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक शाश्वत ठरण्यासाठी ऊर्जेच्या स्वच्छ स्रोतांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पुढाकार घेत आहे. गोदरेज अॅग्रोव्हेटच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये वापरली जाणारी अंदजे 80% ऊर्जा अपारंपरिक स्रोतांपासून तयार होते. उत्पादन प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या प्रयत्नांबरोबरच, गोदरेज अॅग्रोव्हेट ग्रामीण भागात व शैक्षणिक संस्थांमध्येही अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचीयंत्रणा बसवत आहे व उर्जेची वाढती मागणी अपारंपरिक स्रोतांद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.