35 किलोवॅट सौर छतप्रकल्पातून शाश्वत भविष्याला बळ, वीजबिलामध्येही बचत; सेंट झेविअर्स शाळेत गोदरेजचा उपक्रम
मुंबई : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (जीसीपीएस) या कंपनीने मुंबईतील फोर्ट भागातील सेंट झेविअर्स माध्यमिक शाळेच्या छतावर 35 किलोवॅट क्षमतेचे सौरउर्जा संयंत्र बसवले आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून गोदरेजनेबसवलेल्या या संयंत्रातून53 हजार किलोवॅट अवर्स इतकी उर्जा मिळू शकेल. त्यामुळे या शैक्षणिक संस्थेलापर्यावरणवादी हे बिरुद घेता येईलच, त्याशिवाय तिच्या वीजबिलामध्ये वार्षिक साडेतीन लाख रुपयांची बचत होईल.
गोदरेज समुहाच्या ‘गूड अॅन्ड ग्रीन’ या धोरणाचा भाग म्हणून देशात पर्यावरणवादी प्रकल्प उभारले जातात. सेंटझेविअर्समधील हे संयंत्र हे या प्रकल्पाचाच एक भाग आहे. या धोरणानुसार, अपारंपारिक उर्जा निर्मिती करण्यावर भरदेण्यात येत आहे. उत्पादकता आणि पर्यावरण रक्षण या गोष्टींवर कंपनीने आपले लक्ष केंद्रीत केले असून गोदरेजइंडस्ट्रीजमध्ये वापरण्यात येणारी निम्म्याहून अधिक वीज ही या अपारंपारिक स्रोतांतून आलेली असते. त्याचबरोबरग्रामीण भागात व शैक्षणिक संस्थांमध्येही अपारंपारीक उर्जास्रोतांची उभारणी कंपनी करीत असते.देशातीलवीजतुटवड्यावर अपारंपारीक उर्जेच्या माध्यमातून उपाय योजण्यामुळे स्वच्छ वीज या संकल्पनेचा प्रसारही होत आहे.
या उपक्रमाबद्दल गोदरेज समुहाचे अध्यक्ष अदि गोदरेज म्हणाले, ‘’एक उद्योग समूह म्हणून आम्ही नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान राखलेले आहे. 2020 या वर्षासाठी आम्ही आमच्या वाढीचे एक लक्ष्य ठेवले आहे.. 2010 पेक्षा 10 पटींनी मोठे व्हायचे. मात्र याकरीता आम्हाला आर्थिक प्रगतीबरोबरच एक चांगला कॉर्पोरेट नागरीक म्हणून आमचा नावलौकिक कायम ठेवायचा आहे. समाजाला आपण काही देणे लागतो ही भावना श्रेष्ठ आहे आणि सौरउर्जा संयंत्र बसवणे हा या भावनेचाच भाग आहे.’
गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक नादीर गोदरेज म्हणाले, ‘’शाश्वत मूल्यांची व उद्दीष्टांची जपणूक करण्यासाठी आम्ही नेहमीच सामाजिक आणि पर्यावरणवादी उपक्रमांमध्ये गुंतवणूक करतो. या आमच्या दृष्टीकोनामुळे आम्हाला हरीत स्वरुपाचा आणि सर्वसमावेशक भारत घडविण्यात मदत करता येते. सेंट झेविअर्स शाळेला सहाय्य करण्याने या शाळेला सौर उर्जा वापरून सामाजिक बांधिलकी जपता येईल, तसेच वीजबिलांची रक्कमही वाचवता येईल. हे एक छोटे पाऊल असले, तरी यातून आपल्याला उर्जा बचतीच्या ध्येयाकडे जाता येते.’’
गोदरेज इंडस्ट्रीज लि. आणि सहयोगी कंपन्यांचे शाश्वत विकास विभागाचे प्रमुख डॉ. विकास गोस्वामी म्हणाले, पर्यावरणाचा शाश्वत विकास हा आमच्या व्यवसायाचाच एक अविभाज्य भाग आहे. आम्ही विविध उत्पादने करण्याबरोबरच समाजाशी व शैक्षणिक संस्थांशी बांधून राहतो. तेथे आम्ही पर्यावरण-पूरक उपक्रम राबवतो. मुंबईतील 25 शाळा व महाविद्यालयांमध्ये आम्ही कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प राबविले व त्या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाटही लावली. सध्या आम्ही छतांवर सौरउर्जेची संयंत्रे लावून स्वच्छ उर्जा निर्मितीवर भर दिला आहे. जीसीपीएल आणि सेंट झेविअर्स यांच्या सहयोगातून शाळेला अपारंपारिक उर्जा मिळण्याचा एक कायमस्वरुपी स्रोत मिळाला आहे. त्याचबरोबर येथील विद्यार्थ्यांना उर्जेच्या हरीत स्रोतांविषयी माहितीही मिळाली आहे.
सेंट झेविअर्स माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला सनी यावेळी म्हणाल्या, ‘’अपारंपारीक उर्जा वापरावी व उर्जेचा अपव्यय टाळावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असतात, त्यांस या गोदरेजच्या उपक्रमामुळे यश आले आहे. झेविअर शाळेच्या एका माजी विद्यार्थ्याने आपल्या गुरुकुलासाठी हा मोठा उपक्रम राबविला आणि शाळेत मिळालेली शिकवण व्यवहारात उतरवली, यामुळे शाळेशी सर्व संबंधितांसाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे.’’
सेंट झेविअर्स शाळेचे फादर फ्रान्सिस स्वामी म्हणाले, ‘’आमच्या शाळेच्या छतावर सौरउर्जेचे संयंत्र बसवून दिल्याबद्दल गोदरेज उद्योग समुहाचे आम्ही आभारी आहोत. या प्रकल्पामुळे आम्हाला पर्यावरण रक्षण करता येणार आहेच, त्याशिवाय वीजबिलाची रक्कमही वाचवता येणार आहे. अपारंपारीक उर्जा स्रोत वापरल्यामुळे आपल्या देशातील बहुमूल्य अशा विजेची बचत यातून होईल.’’
गोदरेज कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) धोरणानुसार, कंपनीच्या भागधारकांवर सकारात्मक प्रभाव पडेल, अशा स्वरुपाचे कार्यक्रम आखले जातात व प्रकल्प हाती घेतले जातात. या कामी एक सीएसआर समिती आढावा घेण्याचे काम करते. ती सर्व सामाजिक कामांवर देखरेख करते आणि धोरणांची अंमलबजावणी व्यवस्थित होत असल्याची खातरजमा करते. गेल्या काही वर्षांमध्ये जीसीपीएल कंपनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांशी, तसेच भारत सरकारच्या सामाजिक विकास कार्यक्रमांशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे. त्यातून ती स्थानिक स्तरावर उच्च प्रभाव निर्माण करणारे कार्यक्रम स्वतः सादर करते.