महिंद्राच्या सर्वसमावेशक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्पामुळे दरवर्षी 10 दशलक्ष लीटर्स पाण्याचे जतन करण्यास मदत होणार
- महिंद्राचा इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोजेक्ट (आयडब्ल्यूएमपी) अंतर्गत मध्य प्रदेशातील 13 गावांना लाभ मिळणार
- दरवर्षी वाचवलेले 10 दशलक्ष लीटर्स पावसाचे पाणी जलसिंचनासाठी वापरले जाणार
- 1600 कुटुंबांना फायदा मिळणार, तर आधाररेषेच्या वर घरगुती उत्पन्नात सरासरी 50 टक्क्यांची वाढ होणार
दामोह, 22 मार्च 2021 – इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोजेक्ट (आयडब्ल्यूएमपी) हा महिंद्रा अँड महिंद्र लि. आणि नाबार्ड (नॅशनल बँक फॉर अग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट) यांच्यातील सार्वजनिक- खासगी क्षेत्राच्या भागिदारीतून तयार करण्यात आलेला व 2015 मधे हटा-दमोह येथे लाँच करण्यात आलेला प्रकल्प असून त्यामुळे दरवर्षी या प्रदेशात पृष्ठभागावरील 10 दशलक्ष लीटर्स पाण्याची उपलब्धता वाढली आहे. पाणलोट व्यवस्थापन क्षेत्रातील असामान्य पुरस्कार विजेता आयडब्ल्यूएमपी प्रकल्प या प्रदेशातील वंचित आणि दुर्बल शेतकरी समुदायाचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी सुरू करण्यात आला होता.
आयडब्ल्यूएमपी उपक्रमामधे ‘पर्वतरांगापासून दऱ्यांपर्यंत’ पाणलोट व्यवस्थापन उपचार मॉडेलचा अवलंब करण्यात आला असून ते गावांच्या भौगोलिक रचनेच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. या घटकांमधे त्या प्रदेशाची स्वाभाविक रचना, सद्य पाणलोटांची रचना, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचे मार्ग, सद्या स्थितीत पाणी साठवणाऱ्या टाक्या आणि जलसिंचनाची माध्यमे यांचा समावेश होता. प्रत्येक गावाला पाणलोट आराखड्याचे समीकरण आखून दिले जाते, ते एकंदरीत अंतिम निष्कर्ष मिळवण्यासाठी एकजुटीने काम करते. या व्यतिरिक्त या प्रकल्पात शेती उत्पादनक्षमतेच्या विकासावर बीज बदली, गरीब व वंचित शेतकऱ्यांसाठी पद्धती आणि क्षमतांचा विकास करणारे व्यवस्थित पॅकेज यांच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे.
या उपक्रमाअंतर्गंत बचतगटांची निर्मिती करून ते कर्ज स्त्रोतांशी जोडल्यामुळे कित्येक घरांवर विशेषतः तिथल्या स्त्री सदस्यांवर सकारात्मक परिणाम झाला आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा लि. चे प्रमुख मनुष्यबळ स्त्रोत अधिकारी राजेश्वर त्रिपाठी या उपक्रमाच्या यशाविषयी म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षांपासून हटा- दमोह येथे आयडब्ल्यूएमपीने घडवून आणलेला परिणाम हा महिंद्रामधे आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. सुरुवातीला या प्रदेशातील पाण्याचे दुर्भीक्ष मिटवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आयडब्ल्यूएमपी प्रकल्पाने आता या भागात चांगल्या प्रकारे विकास घडवून आणला असून हा प्रकल्प सार्वजनिक- खासगी क्षेत्राच्या भागिदारीचे उत्तम उदाहरण आहे. आयडब्ल्यूएमपीच्या माध्यमातून या प्रकल्पाने अधिक चांगल्या भारतासाठी विकास क्षेत्रातील शाश्वत आणि अनुकरणीय उदाहरण असल्याचे सिद्ध केले आहे.’
महिंद्राने जलसिंचनाचे प्रभावी मार्ग उपलब्ध करत त्यांचाही प्रसार केला आहे, तसेच शाश्वत शेती प्रकारासाठी आराखड्याचे प्रात्याक्षिकही या उपक्रमातून दाखवण्यात आले आहे. यामुळे पूर जलसिंचन पद्धतींचा वापर करणाऱ्या उपक्रम लाभार्थींमधे 60 टक्क्यांची घट झाली आहे, तर या भागातील भूजल पातळीमधे वाढ झाली आहे. त्याचबरोबर शेती जमिनीच्या एकूण 65 टक्के जमिनीच्या मातीतील आर्द्रता टिकवण्यात आली, तर सांडपाणी व्यवस्थेमुळे वाहते वाहत्या पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली. या उपक्रमाअंतर्गत शेती पातळीवरील 87 शेत तळी उभारण्यात आली व त्यामुळे पावसाच्या पाण्याचे जतन होणार आहे. हे पाणी जलसिंचनासाठी वापरण्यात आले असून त्यामुळे 6000 शेतकऱ्यांना मदत झाली व पर्यायाने पिक उत्पादन वाढून घरगुती उत्पादन आधाररेषेपेक्षा 50 टक्क्यांनी वाढले.
प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या इतर महत्त्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे –
- बीज बदली
- शेततळ्यांची निर्मिती
- शेतावरील बांध
- शौचालय बांधकाम
- आरोग्य शिबिरे
- पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि एलईडी लाइट्स