रत्नागिरी, 10 जुलै : अत्यंत दुर्मिळ आणि वन्यप्राण्यामध्ये गणना होणाऱ्या बगिरा अर्थाक ब्लॅक पॅन्थरचं दर्शन सध्या कोकणात होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे इथं अनेक ग्रामस्थांना हा ब्लॅक पॅन्थर निदर्शनास आला. सोशल मिडियावरून सध्या याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. वनविभागाने सुद्धा याला दुजोरा दिला आहे. २०१५ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील ओणी इथं ब्लॅक पॅन्थरला वनविभागाने जिवदान दिलं होतं. विहिरीत पडलेल्या ब्लॅक पॅन्थरला वाचवून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं होतं. त्यानंतर मात्र रत्नागिरी जिल्ह्यात ब्लॅक पॅन्थरचे दर्शन झालं नव्हतं. कोंडीवरेच्या जंगलात दिसणारा ब्लॅक पॅन्थरच असल्याचा दुजोरा आता वनविभागानं दिला आहे. ब्लॅक पॅथर हि बिबट्याची जात आहे. पुर्णतः काळा रंग असणाऱ्या या दुर्मिळ वन्यजिवाचे पुन्हा दर्शन झाल्याने पर्यावरण प्रेंमीसाठी हि आनंदाची बातमी असणार आहे.
त्यामुळे या विभागात वनविभागही आता कॅमेरे लावणार आहे. या विभागातील त्याच्या हालचालींवर वनविभाग लक्ष ठेवणार आहे.